* अंगभूत कौशल्याचा विचार करुन करिअर निवडा – आ. किशोर जोरगेवार *

0
26

****************************

* छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन *

****************************

योग्य माहितीच्या आधारे आपल्यालील गुण, कौशल्याचा विचार करून निवडलेले करिअर केवळ विद्यार्थ्यांची बौद्धिक, नैतिक क्षमताच वाढवत नाही, तर देशाची सामाजिक, आर्थिक बाजूदेखील बळकट करत असते. करिअर निवडत असतांना मुलांनाही घरचांपूढे स्वताचे मत मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र असावे. अंगभूत गुण, कौशल्याचा विचार करून  करिअर निवडल्यास रोजगाराच्या अधिक संधी त्यांना उपलब्ध होईल. सोबतच ते त्या क्षेत्रात मोठे यश मिळवू शकेल. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

****************************
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर व कौशल्य विकास, रोजगार, उद्योजगता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर यांच्या वतीने सांस्कृतीक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले, मधुसुदन रुंगठा, प्रा. रवि मेहंबळे, जिल्हा रोजगार अभियानाचे सहायक आयुक्त भैय्याजी येरणे, शेखर देशमुख, वैभव बोनगिरवार, प्रा. श्याम हेडाऊ आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना. आ. जोरगेवार म्हणाले की, हे स्पर्धेचे युग आहे. यात ठिकायचे असेल तर परिश्रमासह योग्य मागर्दशन विद्यार्थांनी घ्यावे, पालकांनीही स्वतःच्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये. त्यांची मित्र-मैत्रिणींबरोबर तुलना करू नये. पालकांनी  मुलांमधील विशेष प्राविण्य ओळखून त्याला प्रोत्साहित करावे. असे यावेळी ते म्हणाले. आज आम्ही मंत्रालयात जातो. अनेक अधिक-यांशी भेट होते. चर्चा होते. यातील अनेक अधिकारी हे सर्वसाधारन कुटुंबातील असुन मराठी माध्यमाच्या छोट्या शाळांमधुन त्यांचे शिक्षण झाले आहे. त्यामुळे मोठ्या पदावर जाण्यासाठी मोठ – मोठ्या शाळांमध्येच शिक्षण होणे गरजेचे नाही. विद्याथ्र्यांमध्ये शिक्षणाची आवड आणि भविष्यात उच्च शिखर गाठण्याची जिद्द असली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

******************************

देशात  कुशल कामगार संख्या फार कमी आहे. शिवाय, देशातील शिक्षित कामगारांमध्ये रोजगारक्षमतेची मोठी समस्या आहे. व्यावसायिक किंवा व्यावसायिक कौशल्यांच्या कमतरतेमुळे तरुणांना बाजारपेठेतील बदलत्या मागण्या आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे कठीण होत आहे. त्यामुळे आता कौशल्य विकास कार्यक्रम आणखी गतीशील करुन विद्यार्थांमधील कौशल्य विकास करणेही तिथकेच गरजेचे असल्याचे यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले. अंगभूत गुणांचा,  क्षमतांचा विकास करून आवडीच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरी करणे,  मानसिक समाधान मिळवणे, आर्थिक स्थैर्य टिकवणे म्हणजेच करिअर असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

********************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

******************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here