*सोमय्या सारख्या नेत्याची भाजप ने हकालपट्टी करावी :- शहराध्यक्ष सुरजभाऊ शाहा*

0
34

**************************

भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून आता आम आदमी पार्टी भद्रावती शहर अध्यक्ष मा. सुरजभाऊ शाहा यांनी भाजपवर टीका केली आहे. किरीट सोमय्या यांच्या अश्लील वर्तनानिमित्त भाजपा नेत्यांचे खरे चरित्र उघड होत असल्याची टीका आप भद्रावती शहर अध्यक्ष मा. सुरज शाहा यांनी केली आहे.

**************************

ईडी, सीबीआयचा धाक दाखवून सोमय्या यांनी अनेकांना ब्लॅकमेल केले आहे. दुसऱ्यांवर चिखल उडवणारे सोमय्या स्वत: चिखलात लोलतायेत. भाजप चे बृजभुषण सिंह आणी आता हे सोमय्या असे अश्लील काम करत असेल तर भाजप ने त्यांना संरक्षण देन बंद करावे व यांच्यावर कठोर कारवाई करावी. महिलांसोबत सोमय्या असे अश्लील प्रकार करत असतील तर त्यांना दुसऱ्यांवर बोलण्याचा अधिकार नाही याची गृहमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे व भाजपने सोमय्यां सारख्या नेत्यांची पक्षातुन हकालपट्टी केली पहिजेत अशी मागणी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहर अध्यक्ष मा. सुरजभाऊ शाहा यांनी केली आहे.

*************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*  

***************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here