*आम आदमी पार्टी भद्रावतीच्या वतीने मतिमंद विद्यार्थ्यांसोबत केला 76 वा स्वतंत्र दिन साजरा*

0
79

=====================

आज दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय भद्रावती येथे स्वतंत्र दिनाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि आम आदमी पार्टी भद्रावती च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कार्यक्रमात आमंत्रीत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष सुरज शाहा व प्रमुख पाहुणे म्हणून प्रफुल शेलार उपस्थित होते. शहर अध्यक्ष सुरज भाऊ शाहा यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले व प्रफुल भाऊ शेलार यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर शहर अध्यक्ष सुरज भाऊ शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडण्यात आला. या कार्यक्रमात विद्यालयाचे संस्थापक पाचपोर साहेब यांनी आम आदमी पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आभार व्यक्त केले तसेच इतर शिक्षक मंडळी कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी आम आदमी पार्टी भद्रावतीच्या वतीने स्वतंत्र दिनानिमित्त चॉकलेट व बिस्कीट वाटप करून मुलांचे तोंड गोड करण्यात आले. संचालनाचा कार्यक्रम हा रितेश नगराळे यांनी पार पाडला तर आभार प्रदर्शन चेतन पाचपोर यांनी केले आणि कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर सचिव विजय सपकाळ, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर सहसचिव सचिन पाटील, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखा गेडाम, मंगेश भाऊ खंडाळे, अतुल भैसारे, केशवभाऊ पचारे, रितेश नगराळे, राजेश भाऊ नरवडे, बाळूभाऊ बांदुरकर, प्रदीप भाऊ लोखंडे, चेतन भाऊ खोब्रागडे, संजय भाऊ सातपुते, डोरी भाऊ स्वामी, घनश्याम भाऊ गेडाम, विनोद भाऊ लांडगे, राजू भाऊ कोड़ापे, अतुल रोडगे, शुभम रामटेके, शुभम भोस्कर, विकी मुळेवार, दिलीप कापकर, सुभाष कोडापे, सचिन मुरसकर, अनिल कोकुडे, गौरव चांदेकर, बाळकृष्ण पिंपळकर, आनंद पुसाटे व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here