===================
शोभायात्रेत सहभागी भाविकांसाठी शितपेयाचे वाटप
======≈=================
श्री.किृष्ण जन्माष्टमी निमित्त शहरातुन निघालेल्या शोभायात्रेचे गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी भाविकांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाचे वाटप करण्यात आले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सायली येरणे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक विश्वजीत शहा, शहर संघटक करनसिंह बैस, कार्तिक बोरेवार, निलिमा वनकर, कविता निखारे, वैशाली मद्दीवार, अनिता झाडे, सतनामसिंह मिर्धा आदींची उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही किृष्ण जन्माष्टमी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त शहरात दहीहांडी सह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर सायंकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत मंच तयार करण्यात आले होते. सदर शोभायात्रा स्वागत मंच येथे पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी भाविकांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाचे वाटप करण्यात आले. शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.
=====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793





















