फायनान्स कंपनी व खाजगी बँका गुलाबी आमिष दाखवून ‘भोळ्या भाबड्या ग्राहकांचे घेताहेत बळी?

0
31

=======================

निलेश ठाकरे / चंद्रपूर 9371321070
✍️……
आजच्या घडीला दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी, गृह प्रापर्टी यासाठी अनेक लोकं कर्ज घेत असतात मात्र बरेचश्या लोकांना गरज नसतांनाही कर्ज घेण्यासाठी नवनवीन फंडे वापरून फायनान्स कंपणी व बँक यांचेकडून कर्ज पुरवठा सहज उपलब्ध करून दिल्या जात आहे. म्हणूनच प्रत्येक गरजु ग्राहकांना कर्ज घेण्याची जणू सवयच लागली आहे. बोटावर मोजण्याइतकेच असे ग्राहक असतील की ज्यांना आवश्यकतेनुसार कर्ज हवे असते. मुळात कर्जधारकांचा हाच हेतु साधुन फायनान्स कंपनी आणि काही खाजगी बँकांनी कर्ज वाटप करण्याकरिता आपले सर्वत्र जाळे पसरवत कर्ज वाटण्याचा सैर सपाटाच लावला आहे. यापूर्वी कर्ज मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असे आता मात्र कर्ज मिळविण्यासाठीची प्रक्रिया फार सोपी झाली आहे. फायनान्स कंपनी व प्रायव्हेट बँकांकडून कर्ज घेतांना नौकरदार वर्गांना त्यांच्या पगाराची पावती बघुन कर्ज वितरण करण्यात येते. मात्र कर्ज घेणारा व्यवसाईक असेल तर त्यांना आपले आयकर भरले असल्याचे प्रमाण पत्र दाखवून कर्ज उपलब्ध होवु शकते. मात्र कर्ज घेतांना जे पुरावे म्हणून प्रमाणित कागद पत्रे लागतात ते आता सहजपणे बनवुन घेत असल्यामुळे कर्ज घेणार्यांच्या संख्येत लक्षनिय वाढ झाल्याचे दिसुन येते. यापूर्वी तर कुठलेही घरसंसाराचे तसेच आरामदायक वस्तू यांसारखे साहित्य घेतांना कर्ज मिळण्याची सोयच नव्हती आणि ते सहज मिळतही नव्हते म्हणून त्यावेळेस कर्ज घेणे शक्य नव्हते. परंतु आता कालांतरानी कर्ज भेटने अगदी सोपे झाले आहे. त्यात फायनान्स कंपनी आणि बँकेचे कर्मचारी हे स्वताहुन किंवा भ्रमणध्वनी करून ग्राहकांना कर्ज घेण्याकरिता वेगवेगळे प्रलोभन दाखवून आपल्या जाळ्यात अडकवित असतात. गरजु ग्राहक हे कर्ज घेणारे असतातच यात तिळमात्रही शंका नाही. पण ज्यांना कर्ज घ्यायचे नसते त्यांनाही कर्ज घेण्याकरिता फायनान्स कंपनी किंवा बँकेचे कर्मचारी सतत भ्रमणध्वनीवर संपर्क करून आपल्या बँकेचे सुलभ मासिक हप्ते, कमी व्याजदर, मिळणारा लाभ त्वरीत कर्ज मंजुर होणार असल्याचे आमिष दाखवून ग्राहकांना कर्ज घेण्यास प्रवृत्त करत असतात. सद्या फायनान्स कंपन्या आणि बँकांच्या नेटवर्कचा फार मोठा विस्तार असुन कर्ज घेणारे अनेक ग्राहक विनाकारण बळी पडतांना दिसुन येत आहेत.

======================

आज शॉपींगसाठी शहरातील कोणत्याही मोठ्या मॉल मध्ये गेल्यास ‘लक्की ड्रा’ च्या माध्यमातुन नकळत आपला भ्रमणध्वनी क्रमांक घेण्यात येते. त्यानंतर मात्र हाच डाटा त्याचा मोबदला घेत फायनान्स कंपनी व बँक यांना विकला जातो. त्यांतर ग्राहकांना फायनान्स कंपनी तसेच बँके मार्फत आमिष दाखवत आमुची फायनान्स कंपनी, बँक आपल्याला कमी दरात तात्काळ कर्ज पुरवठा करून देईल म्हणून, ग्राहकांशी संपर्क साधतात किंवा आपल्याला आमच्या फायनान्स कंपनी, बँके कडुन तुमची लक्की ड्रा च्या माध्यमातून तुमची वयक्तीक कर्जासाठी निवड झाली आहे म्हनुन तुम्ही परिवारासह सांगितलेल्या ठिकाणी या असे सांगण्यात येते. त्यात ग्राहक सुध्दा संभ्रमात येतो की मी कुठेही कर्जाची मागणी केली नसतांनाही कर्ज मंजुर झाल्याचे बघुन ग्राहकांचे डोक चक्रावून जात असते. सध्या तर बँकेच्या वतीने प्रत्येक पेट्रोल पंपावर, शॉपिंग मॉल यां सारख्या अनेक ठिकाणी बँकेच्या वतीने क्रेडिट्स कार्ड वाटण्याचा सैर सपाटाच लावला असल्याचे निदर्शनास येत आहे. क्रेडिट कार्ड वापरल्यास त्यावर चक्क १८ % व्याजदर आकारण्यात येते. त्यातही जरी आपण क्रेडीट कार्ड अक्टिव्ह नाही केलंय तरीही त्या बद्दल बँके मार्फत ग्राहकांना अव्वाच्या सव्वा चक्रवाढ पध्दतीने व्याज दर लावत दंड आकारल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. आजच्या घडीला कोणतेही साहित्य घेतांना व्याज दरावर मिळणारे कर्ज किंवा १२ % च्या वरिल मिळणारे वयक्तीक कर्ज, क्रेडिट कार्ड चे १८ % च्या वर व्याज दराने पैसे वसूल केल्या जातात. म्हनुन काही कारणांस्तव कर्ज घेतांना विचार करूनच गरज असल्यास कर्ज घ्यावे. तसेच क्रेडिट कार्ड, साहित्य घेण्याकरिता कर्ज, वयक्तीक कर्ज, घर किंवा सदनिका ( फ्लेट ) घेतांना कर्ज घेतांना या सर्वबाबीची कागदोपत्री शहानिशा करूनच कर्ज घ्यायला हवे. कर्ज घेतल्यास यात केवळ फायनान्स कंपनी व बँकेचाच लाभ होत असतो. यात ग्राहकांची मात्र सर्रासपणे लुट होत असते. कर्ज घेतल्या नंतर कर्ज नियमित न भरल्यास फायनान्स कंपनी व बँकेनी ठेवलेले गुंड प्रवृतीचे कर्मचारी ग्राहकांच्या घरी जाऊन त्यांना दमदाटी करून कर्जधारकांना मानसिक त्रास देत असतात. त्यांतरही कर्जाची परतफेड न झाल्यास कर्ज घेतांना कोर्या ( चेक ) धनादेशावर ग्राहकांची स्वाक्षरी घेवुन न्यायालयात कलम 138 अंतर्गत धनादेश बाउंस झाल्याचा न्यायालयात खटला दाखल करण्यात येतो. त्यानंतर ते कर्ज भरण्यास विलंब झाल्याचा न्यायालयात खटला दाखल करून न्यायालयीन, वकील यांचा झालेला खर्च केल्याचा दंड आकारून ग्राहकांकडुन बँक तथा फायनान्स कंपनी च्या मार्फत मोठी रक्कम वसुल करण्यात येते. अश्या मानसिक त्रासापोटी फायनान्स व बँकेच्या वतीने ग्राहकांना मरणाच्या दारी ढकलण्याचे काम होतांनाचे स्पष्ट चित्र सद्यातरी बघायला मिळत आहे. असे अनेक प्रकरणं जिल्हासत्र न्यायालयात सुरू आहेत. यातील अनेक ग्राहकांनी बँकेच्या व फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून आपली जीवन यात्राच संपवुन टाकल्याची माहीती प्रसारमाध्यात आपन वाचत असतो व आपल्या अवती भवती अश्या अनेक घटना सुध्दा घडलेल्या आहेत. कर्ज हे वयक्तीक असो किंवा सदनिकेसाठी घेतलेले असो, किंवा आपल्या स्वप्रातील घर बांधण्यासाठी असो, किंवा मानसाला लागणारे साहीत्य घेण्याकरिता असो, कर्ज घेतांना फायनान्स कंपनी आणि बँकेच्या आमिषाला कोणत्याही भोळ्या भाबड्या ग्राहकांनी बळी पडु नये अन्यथा तुमचे पुढचे तुमचे आयुष्य हे कर्ज भरण्यात आणि न्यायालयाच्या परिसरात पायातील पाय झिजवण्यात जाईल एवढे मात्र नक्की.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here