======≈================
*आम आदमी पार्टी भद्रावती जनशक्ती अभियान अंतर्गत आढावा बैठक संपन्न.*
=======================
आज दि. 24/09/2023 रोजी आम आदर्मी पार्टी भद्रावती तर्फे जनशक्ति अभियान अंतर्गत मीटिंग चे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आम आदमी पार्टी जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हा उपाध्यक्ष योगेश मुरेकार, जिल्हा संघटन मंत्री नागेश्वर गंडलेवार, शंकर सिंग सरदार, बल्लारपूर शहराध्यक्ष रवी पप्पलवार उपस्थित होते. त्यावेळी जिल्हाअध्यक्ष मयूर भाऊ राईकवार यांनी जनशक्ती अभियान मार्फत नियोजन पद्धत व AAP Maharashtra ॲप द्वारे लोकांना कसं जोडायचं यावर मार्गदर्शन करण्यात आले. त्या नंतर जिल्हा उपाध्यक्ष योगेश भाऊ यांनी पार्टीची विचारधारा कार्यकर्त्यांपर्यंत अवगत करून दिली, जिल्हा संघटन मंत्री नागेश्वर गंडलेवार यांनी अरविंद केजरीवाल जी यांच्या संघर्ष आणि पराक्रम आणि दिल्ली व पंजाब मध्ये होणारे कामांबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली, बल्लारपुर शहर अध्यक्ष रवी पप्पलवार भद्रावती, शहराध्यक्ष सुरज शहा व तालुकाध्यक्ष सोनल पाटील यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पक्षप्रवेश कार्यक्रम सुद्धा करण्यात आले वसीम शेख, निखिल भाऊ जट्टलवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सॅम्युअल गंधम यांनी आम आदमी पार्टी मधे पक्ष प्रवेश केला. कार्यक्रमाच्या संचालन शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी केल.
यानंतर आम आदमी पार्टी भद्रावती शहराध्यक्ष सुरज भाऊ शहा यांच्या वाढदिवसानिमित्ताने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सुरज भाऊ शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले. त्यावेळी शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर सचिव विजय सपकाळ, शहर सहसचिव सचीन पाटिल, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, तालुका अध्यक्ष सोनल पाटील, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकार, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखा गेडाम, शहर सदस्य मंगेश भाऊ खंडाळे, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा सचिव अतुल रोडगे, रितेश नगराळे, नांदोरी चे बाळाभाऊ पिंपळकर, गौरव चांदेकर, दिलीप कापकर, शुभम भोसकर, निखिल ताजने, आकाश आत्राम, गणेश लांबट, यश लांबट, महादेव मिलमिले, पवन निसाद व विष्णू रडके व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793