*मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी लोकबिरादरी प्रकल्‍पाचे कौतुक केले*

0
31

=======================

लोकबिरादरी प्रकल्‍प हेमलकसा (भामरागड) चा सुवर्णमहोत्‍सव साजरा.

=======================

महारोगी सेवा समिती, वरोरा द्वारा संचालित लोकबिरादरी प्रकल्‍पाचे हे सुवर्णमहोत्‍सवी वर्ष सुरू आहे. १९७३ रोजी बाबा व साधनाताई आमटे यांच्‍या संकल्‍पनेतुन हेमलकसा (भामरागड) येथे लोकबिरादरी प्रकल्‍पाचे रोपटे लावण्‍यात आले. डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे या दाम्‍प्‍याने आपल्‍या                 सहक-यांच्‍या सहकार्याने माडीया आदिवासी समाजाची सेवा करण्‍याचे मोठे कार्य केले आहे. आरोग्‍याच्‍या सोईसुविधेसोबतच इतर पायाभूत सुविधा निर्माण करून देण्‍याचे त्‍यांनी मोठे कार्य केले आहे. शिक्षणाची गंगा प्रवाहीत करून माडीया आदिवासी समाजाला मुख्‍य प्रवाहामध्‍ये आणण्‍याचे कार्य देखील लोकबिरादरी प्रकल्‍पाने केले आहे. या लोकबिरादरी प्रकल्‍पाचे वर्ष २०२३ हे सुवर्णमहोत्‍सवी वर्ष आहे. त्‍यामुळे राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे तसेच लोकबिरादरी प्रकल्‍पातील दिगंत आमटे, अनिकेत आमटे व इतर सहक-यांचे अभिनंदन करीत भविष्‍यातील वाटचालीकरिता शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. हेमलकसा येथे सुवर्णमहोत्‍सवी वर्षानिमीत्‍त विविध उपक्रम सुरू आहेत. या महोत्‍सवामध्‍ये राज्‍यातील व राष्‍ट्रीय पातळीवरील अनेक गणमान्‍य नागरिकांनी भेट दिली आहे. मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या वतीने शैलेंद्रसिंह बैस व सागर खडसे यांनी हेमलकसा येथे जावून डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. अनिकेत आमटे यांची भेट घेवुन त्‍यांना भविष्‍यात लागणा-या सर्वप्रकारची मदत करण्‍याचे आश्‍वासन दिले.

====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here