आमदार निधीतून मंजूर ईदगाह येथील सुरक्षा भिंतीचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन

0
17

====================

      *चंद्रपुर*

======================

रहमत नगर येथील ईदगाह येथे सुरक्षाभिंत बांधण्यासाठी स्थानिक आमदार विकास निधीतून 25 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. दरम्यान या कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले आहे.

========================

यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, ताहिर हुसेन, ईदगाह कमेटीचे सल्लागार अन्वर खान, युफुस खान, अब्दुल राजीक, अध्यक्ष फारुख बेग, सचिव मुजीब, सय्यद चांद, हारुन सय्यद, फिरोज खान, गुलजर खान, शेख जाकिर, नईमुद्दीन काजी, मोहम्मद इसराईल, बाबा शेख, जाकीर मौलाना, अब्दुल कलाम, जुबिलन मिस्त्री, साकिर कुरेशी आदींची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने अनेक प्रलंबित कामांना गती देण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिल्या जात आहे. या निधीतून अनेक विकासकामे केल्या जात आहे. दरम्यान रहमत नगर येथील ईदगाह येथे सुरक्षाभिंत बांधण्यात यावी अशी मागणी ईदगाह कमेटीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांना करण्यात आली होती. याची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार सदर बांधकामासाठी आमदार निधीतील 25 लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीतून येथे सुरक्षाभिंत तयार करण्यात येणार आहे.
दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या विकासकामाचे भुमिपूजन करण्यात आले आहे. मुस्लिम समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहे. त्या सोडविण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहे. आपण गुप्त मस्जिद सभागृह, घुग्घुस, पडोली, तुकुम येथील कब्रस्तान साठी आपण निधी दिला आहे. पुढे या समाजाची प्रलंबित असलेली काम करायची असुन त्यासाठीही आपले प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या भूमिपूजन कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

=====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=====================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here