=======================
*चंद्रपूर*
========================
महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांनी संता प्रमाणे आपले राजकीय जीवन व्यतीत केले होते. त्यांनी आपल्या मुख्यमंत्री काळामध्ये राज्याच्या विकासाचा संकल्प सिध्द केला होता. मा. सा. कन्नमवार यांनी आपले बालपण चंद्रपूर शहरातील भानापेठ प्रभागामध्ये व्यतीत केले होते. त्यांनी ज्युबिली हायस्कुल चंद्रपूर येथे आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्यामुळे भानापेठ प्रभागामध्ये त्यांची जयंती साजरी करण्यात येत आहे, असे मत सुरज पेदुलवार यांनी व्यक्त केले. दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी भानापेठ प्रभागामध्ये महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांच्या अर्धकृती पुतळयाला मार्लापण करून त्यांची जयंती बेलदार समाज समिती भानापेठ प्रभागाच्या वतीने साजरी करण्यात आली. मा. सा. कन्नमवार यांनी आपले बालपण भानापेठ प्रभागामध्येच व्यतीत केले आहे. त्यांची राजकीय कारकीर्द याच प्रभागातुन सुरू झाली. आपल्या प्रभागामध्ये ज्यांचे जीवन व्यतीत झाले ती व्यक्ती राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविते ही आम्हा प्रभागवासियांना अत्यंत अभिमानाची बाब आहे, असेही पुढे सुरज पेदुलवार म्हणाले. यावर्षी त्यांची १२४ वी जयंती असून पुढील जयंती शतकोत्तर रौप्य महोत्सवी असणार आहे. त्यामुळे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे श्री. पेदुलवार म्हणाले. यावेळी प्रामुख्याने कन्नमवार प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अनिल बोरगमवार , भाजपा भटक्या विमुक्त आघाडी अध्यक्ष दिवाकर पुद्दटवार , अशोक आकुलवार ,राजु मैदमवार , राजु आकुलवार ,प्रविण कत्तुरवार,राम पानगंटीवार ,संतोष बेल्लालवार , राहुल आकुलवार ,शरद जक्कुलवार , विनोद कन्नमवार , प्रविण रेड्डीवार , विश्वास कत्तुरवार , सुनील मिलाल , निखिल जक्कुलवार , अंकित दाचेवार सौ. किर्ती कत्तुरवार ,सौ. स्वाती कत्तुरवार ,सौ. राखी रेड्डीवार , सौ. मंगला कन्नमवार,सौ. माधुरी देशेट्टीवार , सौ. प्रियंका कन्नमवार तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती
==========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069