Home
Home चंद्रपूर *यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध ठिकाणी ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन*

*यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध ठिकाणी ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन*

0
100

========================

  *चंद्रपूर*

========================

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मतदार संघातील विविध भागात ब्युटी पार्लर,हेअर स्टाईल आणि मेकअप शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरांमध्ये शेकडो महिलांना प्रशिक्षित केल्या जात आहे. सदर शिबिर एक महिना चालणार असुन नुकतेच आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सदर शिबिरांचे उद्घाटन करण्यात आले आहे.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, सायली येरणे, माजी नगरसेविका संगीत भोयर, कौसर खान, अनिता झाडे, शमा काजी, वंदना हजारे, माझी नगर सेवक मनोरंजन रॉय, आशा देशमुख, सरोज चांदेकर, चंपा बिस्वास, सविता निखारे, भाग्यश्री हांडे, अस्मिता डोणारकर, अल्का मेश्राम, उषा अगदारी, पुष्पा झाडे, वनिता निहाल, संध्या जगताप, सुष्मा मोहर, पल्लवी महाकुलकर, शिल्पा अगदारी, किर्ती गुरनुले आदींची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील विविध भागात स्वयंरोजगार संबंधित विविध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केल्या जात आहे.  बाबुपेठ,दादमहल, कृष्णा नगर येथील ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला. या शिबिरात जवळपास एक हजार महिला प्रशिक्षीत झाल्या आहे. प्रशिक्षीत सर्व महिलांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
दरम्यान घुग्घुस आणि श्याम नगर आणि नेहरु नगर येथील ब्युटी पार्लर शिबिरांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आपण स्वयंमरोजगारा संदर्भातील महागडे प्रशिक्षण निःशुल्क उपलब्ध करुन देण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाअंतर्गत जवळपास पाच हजार महिलांना आपण विविध प्रशिक्षण देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
सदर ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिरात हेअर स्टाईल, व्हॅक्स, मेनिक्युअर, पेडिक्युअर, हेड मसाज, शॅम्पू, मेहंदी, डाय, फेशिअर, प्लकींग, साडीचे प्रकार, मेकअप, हेअर कटींग, पार्टी वेअर मेकअप आदी प्रकारचे प्रशिक्षण महिलांना दिल्या जाणार  आहे.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here