========================
*चंद्रपूर*
=========================
चंद्रपूर /- विठ्ठल मंदिर प्रभागातील विकास कामाकरीता व नगरोत्थान निधि अंतर्गत राहुल देवतळे शहर उपाध्यक्ष रा.कॉ पा. व संभाजी खेवले, शहर महासचिव, रा.कॉ पा. यांच्या प्रयत्नाने चंद्रपुर शहर महानगर पालिका, चंद्रपुर कडुन विठोबा खिडकी बाहेर, पटांगणाम ग्रीन जीम उभारण्यात आली. तसेच या ग्रीन जिमचा दि. १३ जानेवारी २०२४ ला उद्घाटन सोहळा पार पडला. सदर ग्रीन जिम चा उपयोग सकाळी व सायंकाळी फिरायला जाणाऱ्या पुरुष महिला व वृध्द नागरीकांसाठी होणार आहे. त्यामुळे ग्रीन जीम व्दारे होण्याऱ्या नागरीकांचे स्वास्थ चांगले राहण्यास मदत होईल. सदर जिमचे उद्घाटन बिंदुबाबु बडकेलवार अध्यक्ष, विठ्ठल रुक्मिीनी जेष्ठ नागरीक कृती मंडळ, चंद्रपुर व धन्नाभाऊ येरेवार, अध्यक्ष, श्री विठ्ठल व्यायाम शाळा, चंद्रपुर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. विठ्ठल मंदिर प्रभागातील विकास कामाकरीता निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल राहुल देवतळे, संभाजी खेवले तसेच विठ्ठल मंदिर प्रभागातील
नागरिकांनी चंद्रपुर शहर महानगरपालिका प्रशासनाचे
मनःपूर्वक आभार मानले आहे.
===========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069





















