*प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधानातुन मिळालेल्या अधिकाराचा उत्सव – आ. किशोर जोरगेवार*

0
27

==≠=====================

घुग्घुस येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा वर्धापन दिन साजरा,

 =========================

प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण असून प्रत्येक भारतीयांना या सणाचा अभिमान आहे. आजच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल केलेल्या संविधानातुन मिळालेल्या अधिकाराबरोबरच कर्तव्याचीही जाणीव आपण ठेवली पाहिजे. प्रजासत्ताक दिनी संविधानातून नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व बहाल झाले असून प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधातून मिळालेल्या अधिकाराचा उत्सव असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

===========================

       घुग्घूस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा वर्धापण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त भव्य धम्म संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रामात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला औरंगाबाद येथील भंते करुणानंद थेरे, भंते धम्मानंद, भंते धम्मबोधी थेरो, भंते श्रध्दारक्खित, भंते संघरतन, भंते रत्नमणी थेरो, घुग्घूस नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. जितेंद्र गादेवार, वेकोली महाप्रबंधक आभाचंद्र सिंह, सेंट थॉमर्स चर्च चे पास्टर रेव्ह. मार्कोस खांडेकर, घुग्घूस गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष सरदार संम्मत सिंह दारी, इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या संचालीका शहनाज पठाण, श्री सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाचे मधुकर मालेकर, यंग चांदा ब्रिगेडच्या उषा आगदारी, स्वप्नील वाढई, भारती सादारी, वनिता नियाल, ज्योसना मस्के, किरण टिपले, कामीनी देशकर आदींची उपस्थिती होती.

============================

          भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या वकृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात रुजवीले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड असल्याचे ते मानायचे असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

==========================

          डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना केवळ कायदेशीर कागदपत्र नाही हा एक सामाजिक करार आहे जो आपल्याला एक वैविध्यपूर्ण आणि एकसंध राष्ट्र म्हणून एकत्र बांधतो. आम्हाला आमची मते व्यक्त करण्याचा अधिकार देतो. आजच्या या दिवशी आपण आपल्या राष्ट्राच्या वाढीसाठी आणि समृद्धीसाठी सकारात्मक योगदान देणारे जबाबदार नागरिक बनण्याचा संकल्प करु, असेही ते यावेळी म्हणाले.

===========================

मदरसा येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहन

     =======================

          प्रजासत्ताक दिना निमित्त  विविध कार्यक्रम करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते मदरसा येथे ध्वजारोहन करण्यात आले. या कार्यक्रमाला यंग चांदा  ब्रिगेडच्या अपल्संख्याक  विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशिद हुसेन, मदरसा कमेटीचे अध्यक्ष मुस्ताक खाँन, सचिव अलताफ अली, उपाध्यक्ष इरफान बाबा, उपसचिव हसन सिध्दीकी, फैजान बाबा, अब्दुल सहिद अब्दुल वाहिद, शेख सिराद शेख मिसार, आदींची उपस्थिती होती.  यावेळी उपस्थितांनी तिरंग्याला सलामी दिली. त्यानंतर राष्ट्रगीत झाले या कार्यक्रमाला मदरसा कमिटीच्या सदस्यांची व नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी मिठाई वाटप करण्यात आली.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here