*महाराष्ट्रातील संस्कृती जपणारा पथक म्हणजे ढोल ताशा पथक*:- *विशाल दा. निंबाळकर*

0
45

=========================

*जगदंब ढोल ताशा पथक* यांच्या पाच व्या वर्धापन दिना निमित्य सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जगदंब ढोल ताशा पथकला 5 वर्षाच्या संघर्षमय वाटचालीचा शुभेच्छा देत असताना मन भारावून गेले. जगदंब ढोल ताशा पथक त्यांच्या एकजुटीने व संघर्षमय परिश्रमाने पाचव्या वर्धापन मध्ये पदार्पण केले . 5 वर्षात पूर्ण करण्यात त्यांची मेहनत त्यांच्या संघर्ष अक्षरश मी माझ्या डोळ्याने बघितला आहे आणि तेच चित्र आजअक्षरशः डोळ्या समोर दिसत होते. जगदंब ढोल ताशा पथक – ध्वज पथकच्या संपूर्ण टीमला व त्यांच्या पुढच्या यशस्वी वाटचाली करिता संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या व माता महाकाली चरणी प्रार्थना केली की भविष्यात जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ही जगदंब ढोल व ताशा पथक च नाव उंचावेल. माझा सत्कार व सन्मान केल्याबद्दल *जगदंब ढोल ताशा पथक व प्रशांत मातुरवार,सागर मुक्कावार त्यांच्या संपूर्ण टीम चे सुद्धा आभार मानले*. जगदंब ढोल व ताशा पथक यांनी केलेल्या संघर्षाची यशस्वी 5 वर्षाची वाटचाल बद्दल चंद्रपुर जिल्हातील सामाजिक संघटना व जनते तर्फे आशीर्वाद रुपी कौतुकाची थाप व शुभेच्छाचा वर्षाव होत होता…या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित भारतीय जनता पक्षाचे महामंत्री रवींद्र जी गुरनुले, माजी नगरसेविका सौ. शितलताई गुरनुले, राहुल पाल, *भारतीय जनता युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष गणेश रामूगुंडावार, तेजा सिंग, राहुल देवतळे, मोहन मंचरलावार उपस्थित होते*.

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here