*बँकिंग ग्राहक सेवेला सामाजिक कार्याची जोड*

0
25

=======================

*निर्मल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्ष पूजा मानमोडे यांच्या कार्यकाळाची वर्षपूर्ती* 

=========================

25 वर्षापूर्वी सर्वसाधारण कुटुंबातील प्रमोद नत्थुजी मानमोडे यांनी सहकार क्षेत्रामध्ये एक छोटसं नाणं पेरलं. आज त्या अंकुराचं मोठ्या वटवृक्षात रूपांतरण झाले. निर्मल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक नागपूरसह विदर्भात प्रसिद्ध झाली. त्यात प्रयोगशील, नविनतम कौशल्य आणि उपक्रमशील राहून बँकिंग ग्राहकसेवेला सामाजिक कार्याची जोड देण्याचे काम अध्यक्ष कु. पूजा प्रमोद मानमोडे यांनी केले.
त्यांच्या कार्यकाळाला ३१ जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण झालं. ही निवड त्यांच्यासाठी अनपेक्षित होती. निर्मल बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांच्या मार्गदर्शनात बालपणापासून ‘सहकार’ हा शब्दाची ओळख झालेली. मात्र, प्रत्यक्षात पद स्वीकारताना आव्हानात्मक जबाबदारी होती. कारण, आधीच 2021 ते 22 या काळामध्ये कोविड महामारीमुळे बँकेची आर्थिक स्थिती खराब झाली होती. नवीन कर्ज आणि डिपॉझिट मध्ये देखील घट झाली होती. अशा स्थितीमध्ये, बँकेची जबाबदारी घेताना संचालक मंडळाच्या मार्गदर्शनात आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बँकेची कार्यप्रणाली सुधारण्यासोबतच ग्राहकांना अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक बदल केले.
==========================
बँकेने लहान मुलांमध्ये बचतीची सवय लावण्यासाठी किड्स सेविंग बँक ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, मुलांना बचत खाते उघडता येते. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्याजदराच्या योजना, फिक्स डिपॉझिट, निर्मल लखपती योजना, कार कर्ज, दुचाकी कर्ज, गृह कर्ज, देखील राबविल्या आहेत. तसेच, गोल्ड लोन आणि लघु कर्ज योजना देखील राबविल्या. बँकेला तंत्रज्ञानाची जोड देऊन, बँकेच्या ग्राहकांना दैनंदिन व्यवहार सुरळीत चालवण्यासाठी पॉस मशीन आणि क्यू आर कोड सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात. संयुक्त दायित्व गट योजने अंतर्गत महिलांना कर्जवाटप निर्मल अर्बन बँकेचा पुढाकार घेतला. आता या महिलादेखील आत्मनिर्भर होऊ लागल्या आहेत. बँकिंग क्षेत्रामध्ये इतर बँकांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि कार्यशाळा घेतल्या. ==========================

गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या आणि बँक वर विश्वास ठेवून बँकेच्या ठेवी आणि बचतीमध्ये हातभार लावणाऱ्या ग्राहकांना देखील एक प्रमाणपत्र देऊन आभार व्यक्त करण्यात आलेत. बँकेच्या महिलामध्ये सहकाऱ्यांना आत्मविश्वास जागृत व्हावा यासाठी नवरात्रीच्या उत्सवामध्ये विशेष उपक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. विविध शाळांना भेटी देऊन चित्रकला स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेबद्दलची आवड निर्माण करण्याचे काम बँकेने केले आहे.

========================

गरीब आणि गरजू लोकांच्या आयुष्यात दिवाळी आनंदाने फुलावी, यासाठी निर्मल अर्बन बँक व ह्युमॅनिटी सोशल फाउंडेशन, नागपूर यांनी एक उपक्रम घेतला. या उपक्रमात, ज्यांना दिवाळी विक्री व्यवसाय करायचा आहे, पण जागा मिळत नाही, अश्या गरजू, व्यक्तींसाठी दिवाळीनिमित्त माणुसकीचे दुकान सुरू करून खऱ्या अर्थाने माणुसकी दाखवली.

=============================
यंदा बँकेला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महिला जागृती अभियान दि. १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ दरम्यान राबविण्यात आले. या माध्यमातून आर्थिक व्यवहार करताना महिलांनी घ्यावयाची काळजी व दक्षता याबद्दल माहिती, लहान मुलांसाठी बचतीची योजना व मार्गदर्शन करण्यात आले. सहकार खात्याचे निवृत्त सहाय्यक निबंधक निर्मल बँकेचे उपाध्यक्ष तुकाराम चव्हाण यांच्या अनुभवाचा लाभ बँकेस मिळत आहे. यामुळे, बँकेची प्रतिष्ठा वाढली आहे. पूजा मानमोडे यांच्या नेतृत्वाखाली, निर्मल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी आणि बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here