=========================
*दिल्ली येथील 10 फूट बाहुबली हनुमान विशेष आकर्षण
======================
वरोरा दिनांक 1 फेब्रुवारी*
======================
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कल्पतरू सोशल क्लबच्या वतीने वरोरा शहरातील क्रीडा संकुल मैदानावर 2 ते 7 फेब्रुवारी दरम्यान भव्य फन फेस्ट चे आयोजन करण्यात आले आहे
या फानफेसचे उद्घाटन 2 फेब्रुवारीला आनंदवनातील मूक बधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते होणार असून याच दिवशी दिल्ली येथील प्रसिद्ध दहा फूट उंचीचे बाहुबली हनुमान यांची मिरवणूक दुपारी 3 वाजता गांधी चौकातून काढण्यात येणार आहे. कल्पतरूचे फन फेस्ट चे हे तिसरे वर्ष असून एक लाख 50 हजार वर्ग फुटामध्ये हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये एक लाख लोक भेट देतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला
वरोरा शहरातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मोफत पास चे वितरण करण्यात आले आहे. 3 फेब्रुवारीला प्रसिद्ध गायक तसेच 4 फेब्रुवारीला चा लावणी नृत्याचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. चार चाकी व दोन चाकी वाहनांचे स्टॉल्स, विशाल प्रदर्शनी, पंजाबी,राजस्थानी वऱ्हाडी तसेच इतर खाद्य पदार्थांचे आकर्षक स्टॉल आणि मुलांकरिता मनोरंजनाचे चांदतारा, ड्रॅगन, गगनचुंबी झुले या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण राहणार असल्याची माहिती परिषदेत उपस्थित चेतन शर्मा, राजू महाजन, शशिकांत चौधरी, हुजेफा अली, प्रणय मालू, परीक्षित एकरे, दर्शन मालू, रवी नरोले, अरुण बैद तसेच निकेश संचेती यांनी दिली
पत्रकार परिषदेत माहिती देताना कल्पतरू सोशल क्लबचे पदाधिकारी
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
==========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069





















