===============================
*चंद्रपूर: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,* =========================
चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. =======≠===================
प्रादेशिक अधिकारी श्री. तानाजी यादव आणि प्रभारी वैज्ञानिक अधिकारी श्री. बिपीन भंडारी यांच्यावर M/s. Sunflag Iron and Steel Co. Ltd. बेलगाव अंडरग्राऊंड कोळसा खाणी प्रकल्पामुळे घातक रासायनिक द्रव्यांच्या नमुन्यांमध्ये फेरफार करण्याचा आरोप आहे. 16 जानेवारी 2024 रोजी घेतलेल्या नमुन्यांच्या विश्लेषण अहवालात हे फेरफार करण्यात आले असल्याचे आरोप आहे. =============================
श्री. बेले यांच्या म्हणण्यानुसार, हे दोन्ही अधिकारी 2023 पासून पदावर आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात अनेक जल आणि वायू प्रदूषणाच्या नमुन्यांमध्ये फेरफार करण्यात आले आहेत. यामुळे औद्योगिक कंपन्यांना फायदा झाला आहे आणि पर्यावरणाचे नुकसान झाले आहे. ==========================
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी श्री. बेले यांनी केली आहे.
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069