*आम आदमी पार्टी भद्रावती च्या माध्यमातून हा गंभीर विषय पहुचला मुख्याधिकारी यांच्या दालनात.*

0
22

=========================

 *भद्रावती*

==========================

दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती यांनी मुख्याधिकारी विशाखा शेडकी मॅडम नगर परिषद यांना निवेदन दिले आणि सध्याचा भद्रावती मधील गंभीर समस्या बद्दल चर्चा करण्यात आली. मुख्याधिकारी मॅडम यांनी पथदिवे लावण्यासाठी भद्रावती नगर परिषद कडे फंड नसल्याचे सांगत आपले हाथ झटकले. जिल्हा सहसचिव सोनाल पाटील यांनी लोकांच्या देण्यात येणाऱ्या कर भरणी कशासाठी वापरता असे म्हंटले तर मुख्याधिकारी मॅडम यांनी नागरिकांचा कर अपुरा आहे असे म्हंटले. जर अश्या अत्यावश्यक सोयी सुविधासाठी नगरपरिषद कडे फंड नहीं तर आम् आदमी ने कर का भरावे हा प्रश्न सोनाल पाटील यांनी प्रशासनाला केला.
वॉर्ड मधील बगीच्यांची निर्मिती ही केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी केलेलं सोंग अस दिसत आहे. बगीच्यात कोणतीही साफ सफाई करण्यात प्रशासन असक्षम आहे. त्यामधे नगरपरिषद कडे फंड नसल्यामुळे सफाई कामगार यांचे 6 महिन्याचे पगार रखडले असल्याने सफाई होत नसल्याचे मुख्याधिकारी मॅडम यांनी सांगितलं. शहर अध्यक्ष अनिल कुमार यांनी सुमठाणा येथील बंद असलेल्या पथदिवे यांना तात्काळ चालू करा असे आव्हान केलं. या समस्या प्रशासनाने लवकरात लवकर मार्गी लावा अन्यथा आम आदमी पार्टी नागरिकांना घेऊन नगर परिषद समोर तीव्र आंदोलने करेल असे आव्हान भद्रावती चे शहराध्यक्ष अनिल कुमार राम व सोनाल पाटील यांनी केलं. यावेळी जिल्हा सहसचिव सोनाल पाटील, भद्रावती शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, विनीत निमसरकार, निखिल भाऊ जट्टलवार, प्रफुल भाऊ शेलार, रितेश नगराळे व अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here