Home
Home चंद्रपूर यंग चांदा ब्रिगेडच्या श्याम नगर आणि घुग्घूस येथील ब्युटी पार्लर, मेकअप शिबिराचा...

यंग चांदा ब्रिगेडच्या श्याम नगर आणि घुग्घूस येथील ब्युटी पार्लर, मेकअप शिबिराचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाने समारोप..

0
90

========================

शेकडो महिला झाल्या प्रशिक्षीत.

======================

 यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील श्याम नगर आणि घुग्घूस येथे आयोजित ब्युटी पार्लर, मेकअप च्या निशुल्क शिबिराचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाने समारोप करण्यात आला आहे. या दोनही शिबिरात जवळपास 500 महिलांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.
या समारोपीय कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, सायली येरणे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, कौसर खान, शमा काजी, वैशाली मेश्राम, निलिमा वनकर, कविता निखाडे, अस्मिता डोणारकर, वंदना हजारे, चंपा बिश्वास, शिक्षिका पल्लवी माहुरकर, उषा आगदारी, वनिता निहाल, भारती सुधारी, उज्वला उईके आदींची प्रामूख्याने उपस्थिती होती.
महिलांना स्वताचा व्यवसाय सुरु करता यावा याकरिता विविध प्रकारच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून केल्या जात आहे. या अंर्तगत हजारो महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिल्या गेले आहे. पूढेही असे शिबिरे आयोजित केले जाणार आहे. दरम्यान घुग्घूस आणि चंद्रपूर शहरातील श्याम नगर येथे आयोजित ब्युटी पार्लर आणि मेकअप शिबिराचा समारोप करण्यात आला आहे. सदर शिबिर एक महिना चालले असून या शिबिरामध्ये हेअर स्टाईल, व्हॅक्स, मेनिक्युअर, पेडिक्युअर, हेड मसाज, शॅम्पू, मेहंदी, डाय, फेशिअल, प्लकींग, साडीचे प्रकार, मेकअप, हेअर कटींग, पार्टी वेअर मेकअप आदी प्रकारचे प्रशिक्षण महिलांना दिल्या गेले आहे. त्यामूळे प्रशिक्षण प्राप्त महिलांना स्वताचा  रोजगार उभा करण्यात मदत होणार आहे. यावेळी प्रशिक्षित महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रशिक्षित महिलांसह स्थानिक नागरिक व यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
==========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here