*चंद्रपुरातील बामनी प्रोटीन प्रा. लि. कंपनीद्वारे जलप्रदूषण*

0
47

======================

*राजेश वारलुजी संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था*

===========================

*चंद्रपूर*   

===========================

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा तालुक्यातील बामनी प्रोटीन प्रा. लि. कंपनीद्वारे घातक रासायनिक द्रव्य कंपनीला लागू असलेल्या नाल्यामध्ये सोडल्याने जलप्रदूषण होत असल्याचा आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेने केला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वारलुजी बेले यांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर आणि प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांना पत्राद्वारे तक्रार केली आहे.

=========================

बामनी प्रोटीन प्रा. लि. कंपनीद्वारे घातक रासायनिक द्रव्य कंपनीला लागू असलेल्या नाल्यामध्ये सोडल्याने जलप्रदूषण होत आहे. कंपनीद्वारे वारंवार घातक रासायनिक द्रव्य सोडल्याबद्दल संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेने वारंवार तक्रार केली आहे, परंतु प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. कंपनीच्या धानीच्या दुर्गंधीमुळे माणूस, जलचर, प्राणी आणि पक्ष्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.

==========================

बेके यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, बामनी प्रोटीन प्रा. लि. कंपनी तात्काळ बंद करणे. कंपनी मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करून कार्यवाही करणे. योग्य ती कार्यवाही न झाल्यास संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here