*मोहबाळा येथे ब्रम्हलिन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण सोहळ्याला रविंद्र शिंदे यांची उपस्थिती*

0
40

========================

*डॉ. मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या पुतळा उभारणीकरीता रविंद्र शिंदे यांनी सढळ हातानी दिली देणगी* ==========================

*वरोरा*

===========================

तालुक्यातील मोहबाळा येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाव्दारे ब्रम्हलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच 55 व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण सोहळा वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष् स्व. मोरेश्वर टेमुर्डे यांचे मोहबाळा हे गाव. ब्रम्हलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच 55 व्या पुण्यतिथीनिमित्त गावकऱ्यांनी मोरेश्वर टेमुर्डे यांचा पुतळा गावात बसविण्याची ईच्छा जाहीर करताच मोरेश्वर टेमुर्डे यांच्या पुतळा उभारणीकरीता शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी सढळ हातांनी 51 हजाराची देणगी देण्याचे जाहीर केले तसेच अखील भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुज मोझरीच सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांनी 11 हजार देण्याचा कार्यक्रमात उपस्थित गावकऱ्यासमक्ष कबूल केले.
मोहबाळा येथे राष्ट्रसंत यांच्या पुण्यस्मरण सोहळयातच पुतळा उभारणी जागेचे ह.भ.प. गवते महाराज यांच्या हस्ते कुदळ मारुन भुमीपुजन करण्यात आले. याप्रसंगी रविंद्र शिंदे यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जीवनचरित्र उलगडले तसेच त्यांनी जीवनात व स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली. सोबतच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट च्या विविध योजनांची माहिती नागरीकांना देत या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
याप्रसंगी अ.भा.गु.से.मं.गुरूकुंज मोझरी सर्वाधीकारी लक्ष्मणराव गमे, वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, मोहबाळा माजी पोलीस पाटील गणेशराव टेमुर्डे, वरोरा तालुका प्रमुख वरोरा दत्ता बोरेकर, वरोरा कृ.उ.बा.समिती उपसभापती जयंता टेमुर्डे, विधानसभा प्रमुख भा.ज.पा.रमेश राजुरकर, मोहबाळा ग्राम पंचायत सरपंच नंदलाल टेमुर्डे, मोहबाळा ग्राम पंचायत उपसरपंचा शेवंताबाई मोडक, नगर परिषद भद्रावती माजी नगरसेवक प्रशांत कारेकार, जि.प.क्षेत्र खांबाडा-आबमक्ता विभागीय समन्वयक प्रमोद वाघ, वरोरा पंचायत समिती माजी सदस्य अविनाश ढेंगळे तसेच ग्राम पंचायत सदस्य दिलीप काळे, दिवाकर टोंगे, संगिता उरकांडे, मेघा टाले, माया येकोडे, पुष्पा येटे, दिपीका मेश्राम यांची उपस्थिती होती.
किर्तनकार ह.भ.प.श्री केशवराव महाराज खिरटकर डोंगरगाव वरोरा यांच्या काल्याचे कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here