*रेती माफिया वर पोलिसांनी धाड़ मारून 1 कोटि 83 लाखाच ऐवज जप्त। गड़चांदुर, जिवती परिसरातील रेती माफ़ियात हड़कंप*

0
38

=============================

*रेती माफिया वर पोलिसांनी धाड़ मारून 1 कोटि 83 लाखाच ऐवज जप्त।  गड़चांदुर, जिवती परिसरातील रेती माफ़ियात हड़कंप*
——————————————–777
*गडचांदूर, जिवती, आंबेझरी, पाटण, शेणगाव, लाठी येथील रेती तस्करांचे धाबे दणाणले*
   *चंद्रपूर*
कोरपना तालुक्यात नांदा फाटा बसस्थानकासमोर वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय महेश कोंडावार यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा मारून 6 आरोपींना अटक केली. आरोपींकडून 4 हायवा ट्रक असा एकूण 1 कोटी 83 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवार, 1 मार्च रोजी सकाळी 9.20 वाजताच्या सुमारास करण्यात आली.

===========================

   स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय महेश कोंडावार यांना कोरपना तालुक्यातील नारंडा बस्थानकासमोर ‘हायवा ट्रक’ मधून रेती तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सूचनेवरून त्यांनी एक पथक तयार करून घटनास्थळ गाठले. कारवाईसाठी सापळा रचला. हायवा ट्रक पाहून कारवाई करण्यात आली. कारवाईत संजय निवृत्ती देवकाते (वय 50 वर्ष) रा. जिवती, अंबादास राजू आत्राम (वय 30 वर्ष) रा. अंबेझरी, सूरज प्रभाकर कुमरे (वय 28 वर्ष) रा. लाठी, अशोक धर्मराज राठोड (वय 26 वर्ष), रा. पाटण, यांचा समावेश आहे. सट्टाम वजीर शेख, रा. शेणगाव, सचिन भोयर, रा. गडचांदूर आदींना अटक केली आहे.
चार ट्रक जप्त
पोलिसांनी आरोपींकडून ट्रक क्रमांक एम.एच. 34 बीजी. 9520, एम.एच. 34 बी.झेड. 0221, एम.एच 34 बी.झेड. 5773, ब माल जप्त केला आहे. पोलिसांनी 6 आरोपींना कोरपना पोलिसांच्या ताव्यात दिले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिकारी एम सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, एलसीबी पीआय कोडावार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलिसांनी केली.

========≠================–

*झोटिंग गावतुन रेती तस्करी जोमात* कोरपना तालुक्यातील झोटिंग गावतुन रात्रीच्या वेळेस वनसडी आणि पिपरी येथील 3 ते 4 अवैध रेती वाहतूक करणारे ट्रेक्टर रात्र भर भरधाव वेगाने धावत असल्याने गावातील वातावरण दूषित होत असून जनतेला खुप त्रास सहन करावा लागत  आहे। तसेच अवैध रेती वाहतुकीमुळे शासनाच्या महसूल सुद्धा बुडित होतो आहे तरी या अवैध रेती वाहतुकीला शासनाने त्वरित रोक लवावी।

=============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here