*पोलीस स्टेशन बल्लारशाह येथील खुणाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा*

0
23

========================

पोलीस स्टेशन बल्लारशाह येथील खुणाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा*

========================

           *बल्लारशाह*

========================

पोलीस स्टेशन बल्लारशाह हद्दीत घटना ता. वेळी व ठिकाणी फिर्यादीची बहीण रूपा राजू बहुरिया तिचा मोठा मुलगा सुरज बहुरिया व लहान मुलगा राजकुमार बहुरिया यांनी मागील वर्षी डुक्कर चोरीच्या कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून फिर्यादीचा मुलगा मृतक राकेश बहुरिया यास त्याचा मित्र सुरेश उके गुड्डू सोनकर हे आरोपींचे घरापासून जात असताना हमला करून राकेशच्या पोटात लोखंडी सलाख खूपसुन लाकडी दंड्याने मारहाण करून गळ्यावर तलवारीने वार करून गळा कापून खून केला व गुड्डू सोनकर यास पकडून दांड्याने मारहाण करून घरात कोंडून ठेवले व त्याचे विरोधात साक्ष दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

=========================

सदर प्रकरणात माननीय पी.जी. भोसले साहेब तिसरे कोर्ट सत्र न्यायालय चंद्रपूर यांनी आरोपी नामे राजकुमार राजू बहुरिया व सुरज राजू बहुरिया यांना कलम- 302, 34 भादवी. नुसार जन्मठेपेची सक्षम कारावास आणि एक हजार रुपये व दंड न भरल्यास प्रत्येकी एक महिना कारावासाची शिक्षा. तसेच महिला आरोपी नामे रूपा राजू बहुरिया यांना कलम 506,34 भादवी. नुसार सहा महिने सक्तमजुरी शिक्षा आणि पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवस साधा कारावासाची शिक्षा देण्यात आली.

======================

सदर गुन्ह्याचा तपास सापोनी. शैलेंद्र लहुजी ठाकरे यांनी केला असून प्रकरणातील आरोपी यांचे विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून गुन्ह्याचा योग्य तपास करून आरोपीस शिक्षा ठोकवण्यास सरकारतर्फे सरकारी अभियोग्यता असिफ शेख तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस हवालदार अनिता मोहुर्ले पोलीस स्टेशन बल्लारशाह यांनी मोलाची कामगिरी बजावली. ===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.

=============≠============

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here