*जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी चंद्रपूर, यांचे कार्यालय*

0
20

=============================

*जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी चंद्रपूर, यांचे कार्यालय*

==============================

ई-मेल- chandrapur.rde@gmail.com दुरध्वनी क्रमांक- 07172-250659

============================

क्रमांक, एमएजी/कार्या-8/2-1/2024/232

========================

            *चंद्रपूर*

==============≠============

दिनांक:- 08/03/2024

==========================

ज्याअर्थी मुंबई पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 33 (1) (8) व मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 115 नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व नियमनासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे जिल्हा दंडाधिकारी यांना अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

============================

आणि ज्याअर्थी दिनांक 11/03/2024 रोजी मोजा विसापूर तहसिल बल्लारपूर येथील बॉटनिकल गार्डनचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आलेला असून, सदर कार्यक्रमाकरीता मोठया प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. तसेच उक्त बॉटनिकल गार्डनचे उ‌द्घाटन सोहळयाकरीता मा, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, इतर मंत्री महोदय व मान्यवर, नागरिकांचे चंद्रपूर ते बॉटनिकल गार्डन विसापूर या महामार्गावरून आगमन व निर्गमन होणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहतुकीला अडथळा निर्माण होवू नये या करीता सदर मार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले आहे.

==============================

त्याअर्थी मी जिल्हा दंडाधिकारी, चंद्रपूर मला प्राप्त अधिकारान्वये दिनांक 11/03/2024 रोजी दुपारी 2.00 वाजता ते रात्रो 21.00 वाजता पर्यंत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने बामणी फाटा बल्लारपूर ते बंगाली कॅम्प चौक, चंद्रपूर पर्यंत अवजड वाहतुक बंद ठेवण्याचे याव्दारे आदेशित करीत आहे.

===========================

या कालावधीत अवजड वाहतुकदारांना खालील नमूद पर्यायी मार्गाचा वापर करता येईल.

1. वरोरा, भद्रावती व चंद्रपूर कडून राजुरा किंवा गडचांदूर कडे जाण्यासाठी पडोली-धानोरा फाटा भोयगाव रोडचा अवलंब करावा,

===========================

2. गडचांदूर व राजुरा कडून वरोरा, भद्रावती व चंद्रपूर कडे येण्यासाठी भोयगाव-धानोरा फाटा- पडोली या मार्गाचा वापर करावा,

===========================

3. गॉडपिपरी व कोठारी कडून चंद्रपूर किंवा मुल जाण्यासाठी येनबोडी-पोंभुर्णा या मार्गाचा वापर करावा.

==============================

4. चंद्रपूर व मूल कडून बल्लारशा, गोंडपिपरी, राजुरा जाण्याकरीता पोंभुर्णा येनबोडी मार्गाचा अवलंब करावा,

============================

तरी वरीलप्रमाणे निर्देशाचे पालन करून अवजड वाहतुकदारांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

=============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=====≠=======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here