*उसगाव येथील अपघातात मृत्यु झालेल्या मोहन राजुरकर याच्या कुटुंबीयांची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली सांत्वनपर भेट*

0
23

============================

*उसगाव*

============================

स्कुल बसच्या धडकेत उसगाव येथील मोहन राजुरकर या 26 वर्षीय युवकाचा मृत्यु झाल्याची घटना 18 मार्च ला उसगाव कॉर्नर जवळ घडली होती. या अपघातात दोघे जखमी झाले आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी उसगाव येथील मृतक मोहनच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली आहे. यावेळी सदर कुटुंबाला आर्थिक मदतही केली.
कामानिमित्त तीन मित्र दुचाकीने उसगांव वरून निघाले होते. दरम्यान उसगाव कॉर्नर जवळ एका खाजगी स्कुल बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात 26 वर्षीय मोहन राजुरकर यांचा जागीच मृत्यु झाला तर दोन जन जखमी झाले आहे. यातील एकावर चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर एकाला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी उसगांव येथील मृतक मोहन राजुरकर यांच्या कुटुंबींयाची भेट घेतली आहे. यावेळी मृतकाच्या वडिलांनी घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. अपघात झालेला मार्ग बंद होता मात्र एससीसी कंपणीने हा मार्ग सुरु केला. त्यामुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप यावेळी कुटुंबीयांनी केला. आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी घुग्घुस ठाणेदार यांना दुरध्वनी वरुन संपर्क साधत घडलेला प्रकार समजून घेतला. सदर प्रकरणाची योग्य चैकशी करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर यांनी केल्या आहे.
=============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here