===========================
*चंद्रपूर *
============================
पोलीस ठाणे चंद्रपूर शहर येथे फिर्याद दाखल करण्यात आली की, प्रकरणातील आरोपीतांनी फिर्यादीचे घरी येवुन फिर्यादीस शिवीगाळ केली व यातील मृतकला जिवाने मारण्याची धमकी दिली. व दिनांक २६/१०/२०१९ चे १४/०० वा. दरम्यान यातील आरोपीतांनी मृतक अक्षय उर्फ प्रेम बलवंत मुन वय १९ र्क यास जुन्या वादावरून परत भांडण करून मृतकाचे शरीरावर चाकुने वार करून व गळा कापुन खुन केला. अशा फिर्यादीचे तक्रारी वरून नमुद कलमान्वये पोस्टे चंद्रपूरशहर येथे गुन्हा नोंद केला व सदर गुन्हयाचा तपास श्री अनुज तारे सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधीकारी मुल यांनी केला असुन प्रकरणातील आरोपीतां विरुध्द सबळ साक्षपुरावा गोळा करून गुन्हयाचा योग्य तपास करून आरोपी विरुध्द दोषारोपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सदर खटला मा. डी.जे.३ कोर्ट विद्यमान पी.जी. भोसले सत्र न्यायालय चंद्रपूर यांचे कोर्टात आरोपी विरुध्द सबळ साक्षपुरावे नोंदविण्यात आले.
==========================
आज दिनांक २१/०३/२०२४ रोजी आरोपी १) साजन उर्फ बोंदया रंजीत डोंगरे वय १९, २)
=========================
राजन उर्फ गुलशन रंजीत डोंगरे वय २१ र्क ३) शेख जमीर शेख जलील कुरेशी वय ३१ वर्ष तिन्ही आरोपीतास कलम
=========================
३०२, ३४ भादवी अन्वये आजीवन सश्रम कारावास व ५००० रू. दंड, दंड न भरल्यास प्रत्येकी १ महीना अतिरिक्त
=========================
कारावास उत्सी शिक्षा देण्यात आली.
========================
सदर गुन्हयात सरकारतर्फे सहा. सरकारी अभियोक्ता आसिफ शेख तसेच कोर्ट पैरवी अधीकारी म्हणुन पोहवा संतोश पवार ब.न.७८३ पोस्टे चंद्रपुर शहर यांनी मोलाची कामगीरी बजावली.
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,























