*स्वता:च्या पक्षात अस्तित्व ठिकवू न शकणारे नेतेच आज विविध पक्षात प्रवेश करत आहेत :*

0
20

=======================

*सतत दल बदलणा-या नेत्यांना जनतेनी या निवडणुकीत चांगलाच धडा शिकविला पाहिजे*

===========================

*भाजपा युवा नेते महेश कोलावार यांचा दलबदलू नेत्यांना टोला*
=======================
  *चंद्रपूर*

स्वता:च्या पक्षात अस्तित्व ठिकवू न शकणारे नेतेच आज विविध पक्षात प्रवेश करत आहेत असा टोला भाजपा युवा नेते महेश कोलावार यांनी दलबदलू नेत्यांना मारला आहे.

===========================

पुढे महेश कोलावार यांनी म्हणाले की केवळ स्वता:च्या राजकारणासाठी,स्वता:च्या स्वार्थापोटी लोक अनेक पक्ष बदलत असतात.त्यामुळे राजकारण म्हणजे केवळ पैशांचा व पदांचा बाजार झाला आहे.पैसा फेको तमाशा देखो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

==========================

एकीकडे जो-तो निवडणूक लढविणारा व्यक्ती केवळ पैशाच्या जोरावर व विविध आश्वासन देऊन निवडणूक जिंकण्याचे स्वप्न रंगवतो.मग जिंकल्यावर मात्र केवळ खुर्ची सांभाळण्यात व लावलेल्या पैश्यापेक्षा दुप्पट काढण्यात गुंग असतो. यामुळे दिलेल्या आश्वासनाकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने कुठलीही विकासकामे होत नसतात.यात निवडून दिलेल्या मतदाराचा विकासकामाअभावी अपेक्षा भंग होतात आणि पाच वर्ष असेच निघून जातात.

=========================

दुसरीकडे काही ठिकांनी आरक्षण असल्यामुळे कित्येक अशिक्षित लोकांना काही हुशार व्यक्ती राजकारणात उतरवून पैसा कमविण्याचे कार्य करत आहेत.जिंकून आलेल्या मतदाराला मात्र आपण काय करायचे,आपली जबाबदारी काय आहे हे देखील माहित नसते.याचे कारण म्हणजे अशिक्षितपणा. याच अशिक्षितपणाचा आणि आरक्षणाचा फायदा काही राजकारणातील हुशार व्यक्ती घेत राजकारणाचा खेडखंडोबा करत आहेत. त्यामुळे देशाचे राजकारण किती घसरत आहे याचे चित्र आपण रोजच विविध बातम्यांमधून बघत असतो.

===========================

याचा अर्थ प्रत्येक निवडणूकदार असाच आहे असेही नाही. निवडणूकदार पैसे न वाटता व मतदार पैसे न घेता मतदान प्रक्रिया राबविण्याचे दिवस आले पाहिजेत.त्यासाठी आज मतदाराला जागृत होण्याची गरज आहे.तसेच स्वार्थापोटी व पदासाठी सतत दल बदलणा-या नेत्यांना जनतेनी या निवडणुकीत चांगलाच धडा शिकविला पाहिजे.कारण पक्षासाठी अहोरात्र काम करणारे नेते व कार्यकर्ते अजूनही विविध पक्षात आहेत.पण त्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना राजकारणातील पद वाटप करतांना व टिकीट वाटप करतांना मात्र डावलण्याचे षडयंत्र विविध पक्षात रचले जात असते.याचे कारण म्हणजे सतत दल बदलून स्वार्थासाठी राजकारण करणारे नेते आहेत.अश्या गलिच्छ राज्यकर्त्यांना जनतेनी निवडणूकीत सबक शिकवावा असे आवाहन महेश कोलावार यांनी यावेळी केले आहे.

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here