===========================
*दोन आरोपींना जेल कडे रवानगी तर संजय पाटील अद्याप ही फरार*
================================ चंद्रपूर(क.वृ.से.प्र ): बियर शॉपीच्या नवा परवाना देण्यासाठी लाच मागणारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही. त्यांनी जामीनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या कोल्हापूर येथील तीन घरांवर छापा टाकला. यात सोन्याचे दागिने, आलीशान कार आणि मोठी रोकड या पथकाच्या हाती लागली आहे. ============================ घुग्घुस येथील गोदावरी नावाने बार ॲन्ड रेस्टारंट आहे. त्यांना बिअर शॉपीचा नवीन परवाना काढायचा होता. नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर येथे परवाना मिळण्याकरिता अर्ज सादर केला होता. मात्र, अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे यांनी परवाना देण्यासाठी, ============================= टाळाटाळ केली. यानंतर दुय्यम निरीक्षक खारोडे यांनी बिअर शॉपीचा परवाना मंजूर करून देण्याच्या कामाकरिता एक लाख ३० हजार रुपयांची मागणी केली. परंतु, तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाकडे २५ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून, =============================== पडताळणीची कार्यवाही करण्यात आली. यात उपरोक्त तिन्ही अधिकाऱ्यांनी संगनमत करून लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी चेतन माधवराव खारोडे आणि अभय खताळ यांना लाच घेताना रंगेहाथ अटक केली. ============================= ते पोलिस कोठडीत होते आज त्यांना न्यायालय समक्ष हजर करण्यात आले.न्यायालयाने त्यांची जेल कडे रवानगी चे आदेश पारित केले. ========================== लाच प्रकरणानंतर संजय पाटील फरार झाले. त्यांच्या मागावर लाचलुचपत विभाग, चंद्रपूरचे पथक आहे. मात्र ते अद्याप हाती लागले नाही. दुसरीकडे चंद्रपूर शहह्यातील काही मद्यव्यवासायिकांच्या, =========================== मदतीने त्यांनी जिल्हा न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, कोल्हापूर येथील त्यांच्या तीन निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छापा टाकला. त्यात २८ तोळे सोन्याचे दागिने, कोट्यवधी रुपयांची रोकड, आलीशान कार आणि महागड्या दुचाकी या पथकाने जप्त केल्या असल्याची माहिती सूत्रानी दिली आहे. =========================== नियर्माना डावलून जिल्ह्यात नव्या दारू दुकानांना परवाने देण्यात आले. यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे बोलले जात आहे. येत्या काळात या तिघांव्यतिरिक्त आणखी काही अधिकारी जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ============================ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधीक्षक मंजुषा भोसले व त्यांची टीम ह्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आता कोणाला या प्रकरणात टेबलावर घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे मात्र विशेष. ============================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*. ==============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,