*खासदार अशोक जी नेते यांनी पोर्ला गावातील परिसरात अवकाळी वादळी वाऱ्यांसह पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी..*

0
23

=============================

गडचिरोली :-नुकत्याच काही दिवसात गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला परिसरात अवकाळी वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरांची छपरे,कवेलू उडाल्याने मोठया प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले.याबरोबरच फळे झाडे सुद्धा उफडून पडल्याने सुद्धा नुकसान झाले असल्याने यात सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली नसली तरी संबंधित बऱ्यांचपैकी नागरिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. =============================                   या सदर घटनेची माहिती खासदार अशोकजी नेते यांना मिळताच पोर्ला या गावीतील परिसरात जाऊन नुकसानग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन घराची पाहणी केली.व या बरोबरच जिल्हाधिकारी, तहसिलदार व तलाठी यांना दूरध्वनीद्वारे कळवून शासन स्तरावर तात्काळ नुकसानग्रस्तांचे पंचनामे करत भरपाई देण्याचे निर्देश देत सुचना केल्या. =============================                 या पोर्ला येथील घनश्याम निकुरे, अल पा.म्हशाखेत्री, गोकुळ दाणे,तुळशीदास भिवा राऊत, हिराजी चापले,मनोहर नवघडे,आशिष चापले,रमेश ठाकरे,जनार्धन कोलते, अनिल ठाकरे,लोमेश कोलते,नामदेव गेडाम,मिराबाई बावणे,गजानन कोलते, तसेच अनेक नागरिकांच्या घरावरचे छप्परे व कवेलू अवकाळी वादळाने उडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. =============================           यावेळी नुकसानीची पाहणी करतांना खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक जी नेते यांच्यासह जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, तालुकाध्यक्ष विलास पा.भांडेकर,कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, तालुका महामंत्री बंडूजी झाडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लोमेश कोलते,सामाजिक नेते संतोष दशमुखे,पत्रकार कैलास शर्मा,गोवर्धन चव्हाण,कृ.उ.बा.स. संचालक बापू फरांडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष दशमुखे,अशोक कर्णेवार, तसेच मोठया संख्येनी गावातील नागरिक उपस्थित होते. ==============================         *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here