*बल्लारपूर शहरात वाळूअभावी बांधकामे ठप्प; प्रशासनाने यावर मार्ग काढावा – रविभाऊ पुप्पलवार*.

0
16

=========================

बल्लारपूर            ==========================                  शहरात अनेक महिन्यांपासून बांधकामासाठी मिळणारा वाळू मिळणे कठिण झाले आहे. परंतु अव्वाच्या सव्वा भावात वाळूचा शहरात अवैध पुरवठा सुरूच आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आम आदमी पक्षाने वारंवार तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या कडे केले असतांना देखील या प्रश्नावर अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. यामुळे अवैध रेती तस्करी करणाऱ्यांच्या सोबत अधिकाऱ्यांनी हातमिळवणी तर केली नसेल? असा प्रश्न आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनो उपस्थित केला आहे. अनेक महिन्यांपासून शहरात बांधकाम क्षेत्र विविध अडचणींचा सामना करत आहे, यात सर्वाधिक अडचण वाळूपुरवठ्याच्या अभावामुळेच निर्माण झाली आहे. शहरातील शेकडो बांधकामे वाळूअभावी बंद पडली आहेत. यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. सामान्य नागरिकांना जर रेतीचा पुरवठा होऊ शकत नसेल तर मग नगरपरिषदेने बांधकामासाठीची परवानगीच द्यायला नाही पाहिजे. जोपर्यंत कायदेशीर रेतीपुरवठा होत नाही तोपर्यंत एक मध्यममार्ग म्हणून शहरात एक समिती नेमून त्यामार्फत रेतीचा पुरवठा सुरू ठेवायला पाहिजे. यामुळे अवैध रेती पुरवठा देखील बंद होईल व नागरिकांची सुद्धा गैरसोय होणार नाही असे रविभाऊ पुप्पलवार म्हणाले.         ===========================               *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here