मा. ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या लोकसभा विजयासाठी गौराळा येथील जागृत गणेश मंदिरात महायज्ञाचे आयोजन

0
20

===============================

              *चंद्रपूर*
===========================
जिल्ह्यातील गौराळा येथील जागृत गणेश मंदिरात दिनांक 26 मे 2024 रोज रविवारला संकट चतुर्थीचे अवचित्य साधून जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत विजयश्री प्राप्त व्हावा यासाठी महायज्ञ व प्रसादाचे आयोजन सचिव भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर  उमेश आष्टणकर  यांनी आपल्या सहकुटुंबासह करून घेतले.
जिल्ह्याचा विकास हा अबाधित राहून पुन्हा या मातीच्या सेवेसाठी निवडून यावे, विकासाची नदी सदैव वाहत राहावी, नवनवीन योजना,शिक्षण – आरोग्य व रोजगार या समस्यांचे निर्मूलन करण्याकारिता,अभूतपूर्व विकास व्हावा याकरिता महायज्ञाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी  चंद्रपूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी महामंत्री व माजी जिल्हाध्यक्ष महानगर चंद्रपूर डॉक्टर मंगेश गुलवाडे व चंद्रपूर महानगर चे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी या विजयश्री महायज्ञाला भेट देऊन गौराळा येथील जागृत गणपतीचे दर्शन करून घेतले.
=============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here