**विकासाच्या नावाखाली रेल्वे कंत्राटदाराची मुजोरी**

0
18

==============================

         *गडचिरोली* 

=============================

गडचिरोली शहरालगत रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे त्याकरिता   लागणाऱ्या माती, मुरूम,व इत्तर साहित्याने त्यांचे काम चालू आहे. परंतु  कंत्राटदार शासनाने  ठरवून दिलेल्या मार्गाने ट्रकची  वाहतूक न करता खाजगी शेतकऱ्यांच्या शेतामधून  शेतकऱ्यांची परवानगी न घेता वाहतूक करण्यात येत आहे. ही सर्व वाहतूक करत असताना शेतकऱ्याची विना परवानगीने बांधे फोडून शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान करून कंत्राटदार मुजोरीने   शेतामधून ट्रक आणि जेसीपी मशीन वाहतूक करण्याचा  सपाटा लावलेला आहे. आता शेतकरी पावसाळी फसल लावण्याकरिता तयारी करण्याच्या उद्देशाने शेतात गेले असता ही संपूर्ण परिस्थितीची माहिती *महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव  डॉ. नामदेव किरसान व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांना भ्रमणध्वनी वरून दिली. तात्काळ संबंधित शेतकऱ्यांना घटनास्थळी भेटत , पोलीस विभाग, तहसीलदार यांना माहिती देऊन संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून  नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.* यावेळी उपस्थित नंदू कायरकर, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी  रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष परिवहन सेल काँग्रेस कमिटी  रुपेश टिकले सह शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. ===============================       *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here