==============================
चंद्रपूर(का.प्र.): पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध्य धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषगाने पो.स्टे.चंद्रपूर शहर पो.नि.एकूरके, यांना खबर मिळाली की, विक्रांत सहारे रा.आंबेडकर नगर, चंद्रपूर याचे घरी काही इसम शस्त्र विक्री करीता घेवून येणार आहे अशा खात्रीशीर खबरे वरून मा.पोलीस अधीक्षक साहेब, चंद्रपूर यांचे आदेशान्वये पो.स्टे. चंद्रपूर शहरचे पो.नि.एकूरके, पो. उपनि. निंभोरकर, गुन्हे शोध पथक, पो.स्टे. रामनगरचे पो.नि. गाडे, पो.उपनि.सामलवार, ठाकरे, गुन्हे शोध पथक, स्था.गु.शा.चंद्रपूर चे पो.नि. कोंडावार, स.पो.नि.गदादे व पथक नेमून एकत्रीतपणे मिळालेल्या गोपनीय खबरे वरून विक्रांत विजय सहारे वय 33वर्षे रा.इंदीरा नगर, चंद्रपूर याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरी 1) निलेश रामेश्वर पराते वय 28वर्षे 3) मनोज कोलटवार वय 25 वर्षे दोन्ही रा.बाबा नगर बाबूपेठ चंद्रपूर हे हजर मिळाले त्यांचे जवळ असलेल्या थैलीची झडती घेतली असता थैलीमध्ये एकूण 40 नग 7.62 KF काडतूस, अग्निशस्त्राची मॅग्झीन, मिळून आली सदर काडतूस विक्रांत सहारे यास विकण्या करीता आणल्याचे सांगतले. तसेच विक्रात सहारे यांचे घर झडती मध्ये तलवार, घरासमोरील त्याचे ताब्यातील वाहन महिंद्रा XUV 700 No. MH34-CD-6868 चे झडती घेतली असता गाडीमध्ये एक तलवार व एक धातूचे वाघनख असा एकूण 26,97,000/- रू.चा माल हस्तगत करण्यात आला. सदर तिन्ही आरोपी विरूद्ध पो.स्टे. रामनगर येथे दि.03/08/2024 रोजी अप.क्र. 771/24 कलम 7, 27, 4, 25 भा.ह.का. सह कलम 135 म.पो.का.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तिन्ही आरोपींचा 7 दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आला असून पुढील तपास पो.स्टे. रामनगर करीत आहे. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,