===============================
*चंद्रपूर* ===============================
सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर व इतर वार्ड आणि प्रभागातील रस्त्यांवर अतिशय जीवघेणे खड्डे पडले आहे. जसे महाकाली मंदिर समोरील रस्ता, बागल चौक ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचा रस्ता, चंद्रपूरच्या प्रमुख बस स्थानकापासून बंगाली कॅम्प व समोरील रस्ता, बस स्थानकापासून तूकूम कडे जाण्याचा प्रमुख रस्ता इत्यादी व शहरातील इतर प्रभाग जसे बाबुपेठ प्रभाग, महाकाली कॉलरी प्रभाग , लालपेठ कॉलरी प्रभाग , रयतवारी कॉलरी प्रभाग, इंडस्ट्री इस्टेट प्रभाग, रहमतनगर , भिवापूर प्रभाग, अशा अनेक प्रभागाच्या व शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिशय जीवघेणे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवर सतत वाहतूक सुरू असते, वाहन चालकांना वाहन चालवताना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे. खड्डे चुकवताना अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. रात्रीच्या वेळी काही रस्त्यांवर पथदीप नसल्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यात आढळून दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेले आहेत. तरी लवकरात लवकर रस्त्यावरील सर्व जीवघेणे खड्डे बुजवून चंद्रपूरचे शहराचे रस्ते खड्डे मुक्त करून शहरातील लोकांना न्याय द्यावा अशी सकारात्मक चर्चा चंद्रपूर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त साहेब यांच्याशी करण्यात आली व या संबंधीचे निवेदन ही त्यांना देण्यात आले याप्रसंगी बहुजन समाज पार्टी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार , जिल्हा प्रभारी प्रशांत रामटेके, चंद्रपूर शहर अध्यक्ष अमोल राहुलगडे, घुगुस शहराध्यक्ष सिद्धार्थ कोंडागुर्ला, चंद्रपूर शहर महासचिव मंगेश, सागर करमरकर ,विवेक दुपारे अमरदीप दसोडे , अखिल निमगडे, सुवर्णा रामटेके, पौर्णिमा अवतरे , पूजा पोरेकर व बहुजन समाज पार्टी चे इतर कार्यकर्ता उपस्थित होते.. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================== कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,