================================
गडचिरोली, ४ डिसेंबर – महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात उद्या सकाळी साडेसात वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. विशेषत: दक्षिण गडचिरोलीमध्ये या भूकंपाची तीव्रता जास्त असल्याचे वृत्त आहे. अचानक आलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोक सुरक्षित स्थळाच्या शोधात घराबाहेर पडले.
भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण भारतात असण्याची शक्यता आहे. भूकंप मापक संस्था त्याची तीव्रता आणि स्वरूपाचे विश्लेषण करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता हलकी होती, त्यामुळे कोणतीही मोठी हानी झालेली नाही. मात्र, बाधित भागातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. चंद्रपूर शहरातही या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. काही लोकांच्या घराच्या भिंती हादरल्या.आये. काही लोकांच्या घरांच्या भिंती हादरताना दिसल्या. भीतीमुळे अनेकांनी घराबाहेर पडून मोकळ्या जागेत आसरा घेतला. सकाळी अचानक आलेल्या या भूकंपाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. अद्याप कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही, परंतु या घटनेची अधिकृत चौकशी सुरू आहे. तसेच अफवांवर लक्ष देऊ नका आणि शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेमुळे नागरिकांना नैसर्गिक आपत्तींविरोधात सतर्क राहण्याचा संदेश मिळतो. अशा परिस्थितीत सुरक्षा व्यवस्था आणि पूर्वतयारी यावर अधिक भर देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================= कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*