Home
Home चंद्रपूर *वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांची कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीस भेट*...

*वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांची कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीस भेट* . 

0
93

==============================

*वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांची कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीस भेट* .        ============================                वरोरा विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करण देवतळे यांनी कांचनी फार्मर प्रोडूसर कंपनीला भेट दिली. कांचनी मध्ये सुरू असलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रामध्ये सुरू असलेल्या नोंदणी बाबत माहिती जाणून घेतली. व सी सी आय चे केंद्रप्रमुख आकोटकर यांच्याकडून आतापर्यंत झालेली कापूस खरेदी व कापसाचे येणारी चुकारे त्याबाबत माहिती जाणून घेतली. त्यांच्या माहितीनुसार तिसऱ्या चौथ्या दिवशी कापसाची चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले असल्याचे त्यांनी सांगितले. आजपर्यंत पाच ते सहा तारखेचे सर्व चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याबाबत आनंद व्यक्त केला. सीसीआय च्या कापूस नोंदणी बाबत असणाऱ्या अडचणी त्यांनी शेतकऱ्याकडून जाणून घेतल्या. कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संपूर्ण कामाबाबत सुरू असलेल्या उपक्रमाबाबत कांचनीचे सीईओ बालाजी धोबे यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या उपक्रमाबाबत त्यांनी शुभेच्छा व्यक्त करून होत असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. वरोरा भद्रावती परिसरामध्ये कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीमुळे शेतकऱ्यांना एक चांगली सुविधा उपलब्ध झाल्याचे समाधानाने त्यांनी व्यक्त केले. व कांचनीच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.   ==============================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    =============================                कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here