*बल्लारपुर तहसीलदार व तलाठी यांच्या विरुद्ध लाच प्रकरणी एन्टी करप्शन ब्यूरो चंद्रपुर ची धड़क कार्यवाही*

0
6

================================

                        बल्लारपूर 

                हॅलो चांदा न्यूज 

बल्लारपूर, (वि प्र ):– तहसील कार्यालयातील तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड (वर्ग १) आणि कवडनई साजा येथील तलाठी सचिन रघुनाथ पुकळे (वर्ग ३) यांच्याविरुद्ध लाच मागणी प्रकरणी अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) चंद्रपूरच्या पथकाने कारवाई केली आहे.

तक्रारदार हे मौजा कोठारी, ता. बल्लारशाह येथील रहिवासी असून, ते बिल्डिंग मटेरियल सप्लायरचा व्यवसाय करतात. त्यांनी मौजा कवडजई येथे शेतीचा स्तर सुधारण्याचे काम सुरू केले होते. २३ मार्च २०२५ रोजी जेसीबी आणि दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने माती व मुरूम काढत असताना तलाठी सचिन पुकळे आणि तहसीलदार अभय गायकवाड यांनी शेतात जाऊन परवानगी नसल्याचे सांगितले. शेतातील यंत्रसामग्री जप्त न करण्यासाठी आणि कोणतीही कारवाई न करण्यासाठी दोघांनी एकूण २ लाख २० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने १ लाख १९ हजार ९०० रुपये दिल्यानंतर उर्वरित १ लाख रुपये देण्यासाठी तहसीलदार व तलाठी तगादा लावत होते. त्यामुळे तक्रारदाराने २६ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली.

सापळा आणि अटक :
२६ मार्च रोजी झालेल्या पडताळणीत तलाठी पुकळे यांनी तहसीलदार गायकवाड यांच्या सांगण्यावरून ९० हजार रुपयांची लाच स्विकारण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे १ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. मात्र, तहसीलदार गायकवाड यांनी पैसे स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर बल्लारशाह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, तहसीलदार गायकवाड यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. तलाठी सचिन पुकळे हे सध्या रजेवर असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले व त्यांच्या पथकाने पार पाडली.    ========================      *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================                   

*हॅलो चांदा न्यूज,                         मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here