=============================
राजुरा
हॅलो चांदा न्युज
राजुरा, (का प्र):– पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत दिनांक 31/03/2025 रोजी तीन अनोळखी इसमाने फिर्यादी नामे प्रशांत बंडुजी मानुसमारे वय 42 वर्ष रा. जवाहरनगर वार्ड, राजुरा यांच्याकडे येवुन त्यांना नकली सोने हे ओरीजनल आहे असे सांगुन ते विक्री संदर्भात सौदा करुन फिर्यादीचे 5 लाख रुपयाचे आर्थीक फसवणुक केली अशा तक्रारीवरुन पोस्टेला अप.क्र . 152/2025 कलम 318 (4), 3 (5) भा.न्या.सं अन्वये गुन्हा दाखल आहे.
राजुरा पोलीसांनी सदर गुन्हयाचा सखोल तपास करुन सदर गुन्हयातील आरोपी नामे 1) भानुदास बाबुराव बंजारा वय 40 वर्ष, रा. वसरनी, ता. जि. नांदेड, 2) भगवान सदाशिव कांबळे वय 55 वर्ष, रा. वडगाव रोड मुलकी, ता. जि. यवतमाळ, 3) मतीन अमीर शेख वय 59 वर्ष रा. सावरगड,ता.जि.यवतमाळ यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन नगदी 5 लाख रुपये व एक विवो कपंनीचा मोबाईल कि.अं 10,000/- रु तसेच फिर्यादीकडुन नकली सोना कि.अं 1000 असा एकुण 5,11,000 रु चा माल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी परी.सहा. पोलीस अधिक्षक तथा ठाणे प्रभारी अधिकारी श्री. अनिकेत हिरडे भा.पो.से यांचे कुशल नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनी रमेश नन्नावरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा अनुप डांगे, पो. अं योगेश पिदुरकर, पो. अं महेश बोलगोडवार, पो.अं शरद राठोड,पो.अं आकाश जाधव यांनी केली आहे. ========================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356