Home
Home चंद्रपूर शिक्षण आणि प्रेमाच्या बळावर बौद्विक दिव्यांग मुलांचे भविष्य उज्वल करा – आ. किशोर...

शिक्षण आणि प्रेमाच्या बळावर बौद्विक दिव्यांग मुलांचे भविष्य उज्वल करा – आ. किशोर जोरगेवार.

0
92

============================

स्विकार दुर्बल मनस्कर शाळेत  मार्गदर्शन शिबिर आणि बस लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन

                                चंद्रपूर  

                        हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर. (का प्र):-  आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला हक्काचे स्थान मिळाले पाहिजे. बौद्विक दिव्यांग मुले ही आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या आयुष्यात आनंद, आत्मसन्मान आणि स्वतंत्रतेची भावना निर्माण करणे, ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने हातात हात घालून या कार्यात सहभागी होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. किशोर जोरगेवार यांनी केले.श्री साई मतिमंद शिक्षण संस्था, चंद्रपूर द्वारा संचालित स्विकार दुर्बल मनस्कर (मतिमंद) मुलांची निवास शाळा, ताडाळी येथे मार्गदर्शन शिबिर आणि बस लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला रेखाजाई पिंपळशेंडे, अ‍ॅड. अभय पाचपोर, समाजकल्याण विभागाचे उपयुक्त राजेशजी पांडे, डॉ. दिलीप चौधरी, शाश्वत शेरे, शेरे, नंदकुमार फुले, जैन, मुधोळकर, वैभव सनास्कर, नलगंटिवार, अमोल मारुतकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, “श्री साई मतिमंद शिक्षण संस्था ज्या प्रकारे या मुलांच्या विकासासाठी कार्यरत आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. केवळ शिक्षणच नव्हे, तर प्रेम, सहकार्य आणि योग्य दिशा या मुलांसाठी येथे दिली जात आहे. आजच्या या कार्यक्रमात नव्या बसचे लोकार्पण करण्यात आले आहे. ही बस या मुलांसाठी केवळ वाहतुकीचे साधन नसून त्यांच्या स्वप्नांना गती देणारे साधन ठरेल. शिक्षणाचा आणि विकासाचा हा प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित व्हावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.

या मुलांसाठी केवळ भौतिक सुविधा पुरवणे पुरेसे नाही, तर त्यांना प्रेमाने, मायेने समजून घेऊन जगण्याची संधी देणे आवश्यक आहे. आम्हीही येथे आवश्यक त्या सर्व मदतीसाठी कटिबद्ध आहोत. ही मुले समाजाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांना वेगळे न मानता, त्यांच्या गरजांनुसार विशेष प्रेम, काळजी आणि संधी देणे, ही प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे असे आ.किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  ==========================  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   =========================   *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*      *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here