===============================
पोलीस स्टेशन रामनगर ची कारवाई!
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर(का.प्र.): दिनांक १७ मे, २०२५ रोजी पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील माध्यमिक शाळेतील कॅम्प्युटर, सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर ईत्यादी साहित्य चोरीची तक्रार नोंदविण्यात आली होती. सदर गुन्हयाचा तपास पोलीस स्टेशन रामनगर चे गुन्हे शोध पथकाने करुन तपासादरम्यान शाळेत गैरवर्तनाच्या कारणावरुन शाळेतुन काढुन टाकलेल्या एका विधी संघर्ष बालकाने त्याचा अल्पवयीन साथीदाराचे मदतीने शाळेत चोरी केल्याची माहिती निष्पन्न झाल्यावरुन दोन्ही विधी संघर्ष बालक यांना त्यांच्या पालकांसमक्ष ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली देवुन आपल्या घरातुन शाळेतुन चोरलेले कॅम्प्युटर, सीसीटीव्ही कॅमेरा, डीव्हीआर मशीन ईत्यादी साहित्य किंमत ४३,७००/- रुपयाचा माल काढुन दिल्याने तो जप्त करुन दोन्ही विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेवून बाल न्यायालयात हजर करण्यात.आले आहे. सदरची कामगिरी चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, पोलीस स्टेशन रामनगर यांचे नेतृत्वात स.पो.नि. देवाजी नरोटे, स.पो.नि. हनुमान उगले, पो अं. जितेंद्र आकरे, शरद कुडे, आनंद खरात, लालु यादव, पेतरस सिडाम, प्रशांत शेंदरे, सचिन गुरनुले, मनिषा मोरे, रविकुमार ढेंगळे, संदीप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल्ल पुप्पलवार, ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356