Home
Home गडचिरोली उपसरपंच सौ. अर्चनाताई बोरकुटे यांचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांसह साजरा – साखरा शाळेतील...

उपसरपंच सौ. अर्चनाताई बोरकुटे यांचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांसह साजरा – साखरा शाळेतील आगळा उपक्रम.

0
209

गडचिरोली

हॅलो चांदा न्यूस

ता. गडचिरोली जि. गडचिरोली |

साखरा.(ता प्र) :- गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये एक प्रेरणादायी व सामाजिक भावना जपणारा कार्यक्रम पार पडला. ग्रामपंचायत साखरा येथील उपसरपंच सौ. अर्चनाताई बोरकुटे यांचा वाढदिवस शाळेतील शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.

या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले होते. उपसरपंच अर्चनाताई बोरकुटे यांना विद्यार्थ्यांनी शुभेच्छा देत स्वागत केले. विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सौ. बोरकुटे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ, देऊन आपला वाढदिवस साजरा केला. त्यांच्या चेहऱ्यावरची समाधानाची भावना ही विद्यार्थ्यांच्या आनंदात परावर्तित होत होती.

या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख श्री. मुलकलवार सर, मुख्याध्यापक श्री. राजेन्द्रजी घुगरे सर, बाल कल्याण समिती गडचिरोलीचे सदस्य श्री. दिनेश बोरकुटे, ग्रामपंचायत सदस्य श्री. दिनेश चौधरी, तसेच सौ. जयमाला मेश्राम यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
याशिवाय शाळेतील शिक्षकवृंद – श्री. दिनेश सलाम सर, शिक्षिका सौ. रेखा गडपल्लीवार मॅडम, सोनटक्के मॅडम, संगीड़वार मॅडम, हेमके मॅडम व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना सौ. अर्चनाताई बोरकुटे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण होईल असा प्रत्येक क्षण साजरा करण्याचा माझा प्रयत्न असतो. समाजाच्या उभारणीसाठी शिक्षण हा महत्वाचा दुवा आहे, आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे.असे सांगितले कार्यक्रमाचे संचलन शिक्षिका रेखा गडपल्लीवार यांनी केले तर आभार संगीडवार मॅडम यांनी मानले.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here