पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे शांततेत पार पडला हा विसर्जन सोहळा!
चंद्रपूर(वि.प्र.): चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन सोहळा अत्यंत आनंदाने उत्साहाने व शांततेने पार पडला.
चंद्रपूर परीसरातील इरई नदी येथील भव्य असे विसर्जन कुंडात गणेश विसर्जन करण्यात आले.पोलीस स्टेशन रामनगर, चंद्रपूर शहर व दुर्गापुर पोलीस स्टेशन अंतर्गत मिरवणूक व विसर्जन अत्यंत शांततेत पार पडले.
पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथील 88, पोलीस स्टेशन रामनगर येथील 37,
पोलीस स्टेशन दुर्गापुर येथील 12, व पोलीस स्टेशन पडोली येथील 01, असे एकूण-138. गणेश मूर्ती चे विसर्जन शांततेत पार पडले. 137 गणपती चे विसर्जन चंद्रपूर शहर महानगर पालिकेद्वारा निर्मित विसर्जन कुंडात करण्यात आले तर रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील चंद्रपूरचा राजा या गणपती मूर्तीचे विसर्जन इरई नदीच्या पात्रात 7 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 करण्यात आले.
गणेश विसर्जन मिरवणूकीची सुरुवात दिनांक 06 सप्टेंबर 2025 चे 08:30 झाली तर समाप्त दिनांक 07 सप्टेंबर 2025 चे 09/45 वाजता पर्यंत झाले.

जनसमुदाय प्रेक्षक भक्तगण अडीच लाख ते तीन लाखापर्यंत या मिरवणुकीत बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते.

चंद्रपूर येथील गणेश विसर्जन सोहळ्यात चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात सहा डी.वाय.एस.पी. अठरा पोलीस निरीक्षक, 96 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक व 846 पुरुष महिला अंमलदार व 313 महिला पुरुष सैनिक होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आला होता.विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे हे सुद्धा फील्ड वर कार्यरत होते.

चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तर प्रत्यक्ष फील्ड वर उतरून बंदोबस्ताची धुरा सांभाळल्याने नागरिकाकडून त्यांच्या या विशेष कार्य शैलीचे कौतुक केले जात होते, हे मात्र विशेष!
चंद्रपूर येथील जटपुरा गेटवरील स्वागत मंडपात चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, चंद्रपूरचे उपविभागीय दंडाधिकारी संजय पवार, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त मंगेश खवले, चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, संतोष गर्गेलवार, मंडळ अधिकारी प्रवीण वरभे,चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, सदानंद खत्री,शहर शांतता समिती सदस्य प्रशांत हजबन, डॉ.रवी अल्लुरवार, हे प्रामुख्याने पुष्पवर्षाव करून बाप्पा चे आशीर्वाद घेत होते.
चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, सदानंद खत्री,शालिनी भगत तसेच चंद्रपूर शहर शांतता समितीचे सदस्य प्रशांत हजबन,दर्शन बुरडकर,श्रीमती रेखा धनंजय दानव, मोरेश्वर खैरे, व रामनगर पोलीस स्टेशन शांतता समिती सदस्य गुलाब पाटील, मतीन कुरेशी,भारती दुदानी, ताजुद्दीन शेख, पोलीस मित्र सह इको प्रो चे बंडू धोत्रे व त्यांची पुर्ण टीम यांनी बंदोबस्तादरम्यान चांगली कामगिरी केली.
या बंदोबस्तादरम्यान चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके आपल्या संपूर्ण टीम सह तसेच रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा आपल्या पूर्ण टीम सह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा व विसर्जन सोहळा शांततेने पार पाडावा यासाठी प्रयत्नशील होते.
पोलीस निरीक्षक आसिफ राजा, पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, लता वाढिवे व 14 पोलीस निरीक्षक बंदोबस्तादरम्यान फील्डवर कार्यरत होते. विशेष शाखेचे सुजित बंडीवार, राजू अर्वेल्लीवार,दीपक जुमने,दिनेश वाकडे हे सुद्धा बंदोबस्त दरम्यान पूर्ण वेळ हजर होते. पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके व ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे विसर्जन मिरवणुकीत जटपुरा गेट येथे सक्रियतेने सहभाग घेत होते.
संध्याकाळी 5 ते 7 वाजतादरम्यान जयंत टाकीज चौक ते जटपुरा गेट पर्यंत गणेश विसर्जन मिरवणुकीत गॅप पडली होती परंतु सात वाजेपासून गणपतीची रांग लागली व दिनांक 7 सप्टेंबर 2.40 पर्यंत सर्व गणपती मंडळानी जटपुरा गेट पास केला चंद्रपूर परिसरातील हा विसर्जन सोहळा अत्यंत आनंदाने उत्साहाने सर्वांच्या सहकार्याने व पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे तसेच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, तसेच मनपा प्रशासन यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा विसर्जन सोहळा अत्यंत शांततेत पार पडला हे मात्र विशेष!
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*