Home
Home चंद्रपूर बहुजन समाज पार्टीचे माजी नगरसेवक सुधीर कारंगल यांचा भाजपमध्ये प्रवेश.

बहुजन समाज पार्टीचे माजी नगरसेवक सुधीर कारंगल यांचा भाजपमध्ये प्रवेश.

0
168

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम.

HELLO CHANDA NEWS

   

     चंद्रपूर,(का. प्र.) : नागपूर येथे भारतीय जनता पक्षात महत्त्वपूर्ण प्रवेश घडला. बहुजन समाज पार्टीचे इंडस्ट्रियल प्रभागाचे सलग तीन दा नगर सेवक राहिलेले माजी नगरसेवक सुधीर कारंगल यांनी आज (शुक्रवार) भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.

                 या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणआमदार किशोर जोरगेवारमहानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारप्रदेश कार्यकारणी सदस्य तुषार सोमतसेच प्रकाश देवतळेसुमित गुप्ताहर्ष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

                    गेल्या काही महिन्यांमध्ये विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. कॉंग्रेससह इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला असूनपक्षाचा संघटनात्मक विस्तार वेगाने वाढत आहे.

                 आज सुधीर कारंगल यांनीही ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेश करून भाजपच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद अधिक मजबूत होणार आहे.

                    यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले किभारतीय जनता पक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांच्या श्रमांवर उभा असलेला पक्ष आहे. आम्ही विकासपारदर्शकता आणि लोकहित यांना प्राधान्य देणारे समाजकारण करतो. सुधीर कारंगल यांसारख्या समाजाभिमुख नेत्याचा पक्षात प्रवेश हा आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

             गेल्या काही महिन्यांमध्ये विविध पक्षांतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आमच्यात सामील झाले आहेत. हा विश्वास आम्ही विकासकामांद्वारे आणि जनसेवेच्या माध्यमातून मिळवला आहे. असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here