Home
Home चंद्रपूर विरोधकांकडून टीका तर सत्ताधाऱ्यांकडून अर्थसंकल्पाचे समर्थन.

विरोधकांकडून टीका तर सत्ताधाऱ्यांकडून अर्थसंकल्पाचे समर्थन.

0
112

HELLO CHANDA NEWS

                 चंद्रपूर,(वि. प्र.) : केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्वसामान्य जनतेला न्याय देणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात लोककल्याणकारी योजना व निधीची तरतूद करण्यात येत आहे. त्याचेच प्रतिबिंब सादर झालेल्या अर्थसंकल्पात सुद्धा उमटले आहे. सामान्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री, चंद्रपूर.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो, या भावनेची ठळक प्रचिती देणारा हा अर्थसंकल्प असून भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत अग्रस्थानावर नेण्याचा दृढ संकल्प त्यातून दिसून येतो.

सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री, तथा बल्हारपूर क्षेत्र विधानसभा आमदार,

सादर झालेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचा सुकाळ आणि आश्वासनांचा पाऊस आहे. प्रत्यक्षात मात्र हा अर्थसंकल्प सामान्यांच्या तोंडाला पानं पुसणारा, ठराविक राज्यांवर डोळा ठेवून आखलेला एक ‘राजकीय अजेंडा’ आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून देण्याची कोणतीही हमी नाही.

प्रतिभा धानोरकर, खासदार, चंद्रपूर.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

विशेष प्रतिनिधी, विनोद दुर्गे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here