Home
Home चंद्रपूर जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. राजेश नाईक यांचे ९४ वे रक्तदान.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. राजेश नाईक यांचे ९४ वे रक्तदान.

0
134

HELLO CHANDA NEWS

    नागपूर,(वि. प्र.) “मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे” या उदात्त विचाराची प्रचीती देत, जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्याने प्रा. डॉ. राजेश नाईक यांनी आपले ९४ वे स्वैच्छिक रक्तदान करून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

  सदर रक्तदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथील रक्तपेढीत संपन्न झाले.

या प्रसंगी रक्त संक्रमण अधिकारी डॉ. धनश्री केलकर, डॉ. मुकेश वाघमारे, डॉ. हिमांशू पिंपरीकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आशिष पवार तसेच स्टाफ नर्स संजीवनी निकोसे, तन्नू सिंग, विभावरी शेंडे आणि कृष्णा पाकमोडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

    प्रा. डॉ. राजेश नाईक हे विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.

    ते भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समूह समितीचे सदस्य असून महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचेही सदस्य आहेत.

     तसेच डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, गांधीबाग, नागपूर येथील नियामक व कार्यकारी समितीचे सदस्य, मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांचे प्रतिनिधी, नागपूर शहर केंद्रीय पोलीस शांतता समितीचे सदस्य, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (नागपूर शाखा) चे कार्यकारिणी सदस्य तसेच मयुरेश जीवन विकास परिवार संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.

  या उल्लेखनीय कार्याबद्दल श्री मयुरेश जीवन विकास परिवार संस्थेच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

 या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रा. डॉ. राजेश नाईक यांना रक्तदाता कार्ड, रक्तदान प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

  ही उल्लेखनीय पुढाकार समाजामध्ये स्वैच्छिक रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत असून, अधिकाधिक नागरिकांनी या जीवनदायी अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असा प्रेरणादायी संदेश देत आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here