Home
Home चंद्रपूर भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा बैठक संपन्न.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा बैठक संपन्न.

0
34

HELLO CHANDA NEWS

        भद्रावती,(वि.प्र.) : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा स्तरीय बैठकीचे नुकतेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा कार्यालय चंद्रपूर येथे पार पडण्यात आली.

  शंभर वर्षापुर्वी 26 डिसेंबर 1925 रोजी अधिकृत भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली खरे म्हणजे भांडवलशाही जरी आज एक विचारसरणी म्हणुन अविर्भाव आणत असली तरी ती सुमारे चार- पाचशे वर्ष उत्क्रांत होत असलेली सामाजिक व्यवस्था होती व आहे.

                    अठराव्या शतकापर्यंत भांडवलशाही अशी संज्ञाही प्रचलित नव्हती कम्युनिस्ट क्रांतीनंतर प्रस्थापितांचे तत्त्वज्ञान म्हणुन भांडवलशाहीचे वैचारिक समर्थन केले जाऊ लागले.

  या बैठकीचे अध्यक्षस्थान कॉमरेड प्रा नामदेव कन्नाके – जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय किसान सभा चंद्रपूर हे होते.

              प्रमुख पाहुणे म्हणून कॉमरेड शाम काळे – राज्य सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष नागपूर , कॉमरेड डॉ महेश कोपुलवार – राज्य सचिव मंडळ सदस्य भारतीय कम्युनिस्ट पक्ष गडचीरोलि , कॉमरेड रविन्द्र उमाटे – जिल्हा सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष चंद्रपूर , कॉमरेड राजू गैनवार – माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष भद्रावती
इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

        कॉमरेड राजू गैनवार यांनी संपूर्ण तालुका व जिल्हा आंदोलनाची माहिती दिली घरचलो अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे पक्ष व जनसंघटना बांधणी करून संघटन मजबूत करावे असे सांगितले या मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची तालुका निहाय बैठकीचे आयोजन पुढील प्रमाणे करण्यात आले.

 18 / 04 / शिंदेवाहि – रत्नापुर 20 / 04 गोंड पिपरी, 21 / 04 ब्रह्मपुरी- नागभीड , 22 / 04
पोभूरणा , 23 / 04 चंद्रपूर शहर , 24 / 04 राजूरा ,  25 / 04 गडचांदूर-
कोरपणा , 26 / 04 भद्रावती असे आहे.

   बैठकीचे विषय — मागील इतिवृत्त वाचून कायम करणे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सन 2026 चि सदस्य व नूतनीकरण करणे, पुढील आंदोलनाची रूपरेषा तयार करणे, पक्षाच्या जनसंघटना कार्याचा आढावा घेणे, अध्यक्षाच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय

या मध्ये प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन पर भाषणे झाली.

      या बैठकीला प्रत्येक तालुक्यातून सचिव व नेते पदाधिकारी सदस्य गण हजर होते.

या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कॉमरेड राजू गैनवार यांनी केले.

      या बैठकीला कॉमरेड प्रकाश रेड्डी कॉमरेड दादा ठाकरे, कॉमरेड अरविंद कॅप्टन, कॉमरेड वनिता
कुंटावार , कॉमरेड डॉ महेश रेड्डी, कॉमरेड किशोर निब्रड, कॉमरेड श्रीधर वाढइ इत्यादीनि अथक परिश्रम केले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here