Home
Home चंद्रपूर १४ एप्रिलच्या घटनेचा सखोल तपास करून आरोपींना कठोर शिक्षा करावी: संतप्त आंबेडकरी...

१४ एप्रिलच्या घटनेचा सखोल तपास करून आरोपींना कठोर शिक्षा करावी: संतप्त आंबेडकरी जनतेची मागणी.

0
101

HELLO CHANDA NEWS

            चंद्रपूर(का.प्र.): विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती जल्लोषात साजरी होत असताना, स्थानिक गांधी चौक येथे डी.जे.वर नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून रविकांत टेंभुरकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली, तसेच अनिकेत गलबले हा युवक गंभीर जखमी झाला.

       या दुर्दैवी घटनेमुळे आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून, संतप्त जनतेने प्रशासनाला निवेदन देत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ही घटना आंबेडकरी समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावणारी असून, भीमजयंतीसारख्या पवित्र व प्रेरणादायी कार्यक्रमाला गालबोट लावणारी आहे. तसेच, रॅलीदरम्यान धारदार शस्त्रे कशी आली, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

        यासोबतच, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी व आर्थिक मदत देण्यात यावी, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डी.जे.वर निर्बंध घालण्याचा विचार करावा, अशी आग्रहाची विनंती करण्यात आली.

      या वेळी शिष्टमंडळात चळवळीचे ज्येष्ठ नेते प्रवीण खोब्रागडे यांच्यासह मृतकाचे भाऊ चंद्रकांत टेंभुरकर, प्रेमकान टेंभुरकर, देशक खोब्रागडे, अ.वि. टेंभरे, अशोक फुलझेले, किशोर तेलतुंबडे, अनंत बाबरे, अशोक निमगडे, प्रतीक डोर्लीकर, ॲड. राजस खोब्रागडे, बंडू ठेंगरे, प्रेरणा करमरकर, तनुजा रायपुरे, डॉ टी डी कोसे, राजकुमार जवादे, धर्मेश निकोसे, सुरेंद्र रायपुरे, सुरेश नारनवरे,जितेंद्र डोहाणे शंकर वेल्हेकर प्रवीण नेल्लूरी, बुद्धप्रकाश वाघमारे ज्ञानेश्वर राऊत जमनादास मोटघरे राजू किर्तक निर्मला नगराळे, गीता रामटेके,ॲड. पूनम उमरे, अवंतिका उके, ज्योती शिवणकर,ज्योती सहारे, माधुरी खाडे, मृणालिनी नगराळे, सिद्धार्थ वाघमारे, अनिता जोगे, शालिनी भगत, वर्षा घडसे, माया मुन अनिल खोब्रागडे गजानन राऊत, हर्षल खोब्रागडे, आयुष रामटेके, प्रणित तोडे आदींसह शेकडो आंबेडकरी बांधव उपस्थित होते.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here