Home
Home चंद्रपूर माणुसकीचा स्पर्श.आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीतून दिव्यांग महिलेला मिळाले नवजीवन..! आ....

माणुसकीचा स्पर्श.आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीतून दिव्यांग महिलेला मिळाले नवजीवन..! आ. मुनगंटीवार यांच्या तत्पर मदतीने पुष्पा खैरकर यांच्या आयुष्यात आशेची नवी पहाट. आ.मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द पाळत तत्काळ मदत ; मानवी संवेदनांचा हृदयस्पर्शी अनुभव.

0
27

HELLO CHANDA NEWS

            चंद्रपूर,(का. प्र.) – संघर्षमय आयुष्यात एखाद्या क्षणी मिळालेला आधार हा केवळ मदत नसून नवजीवनाची सुरुवात ठरतो, याची जिवंत अनुभूती बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील दिव्यांग महिला पुष्पा अशोक खैरकर यांच्या आयुष्यात नुकतीच आली. त्यांच्या हालचालींना आलेल्या मर्यादांमुळे दैनंदिन जीवन अत्यंत कठीण झाले असताना, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशीलतेतून दिलेल्या व्हीलचेअरच्या मदतीने त्यांच्या आयुष्यात आशेची नवी किरण फुलली आणि माणुसकीचा स्पर्श पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

    पुष्पा अशोक खैरकर यांच्या मुलीने आईसाठी व्हीलचेअरची मागणी केली होती. ही मागणी केवळ एक साधन मिळवण्यासाठी नव्हती, तर आईला स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगता यावे, या भावनेतून केलेली एक आर्त हाक होती.

    या भावनांची दखल घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत मदतीचे आश्वासन दिले.

 आपला शब्द पाळत २२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी चार वाजता पुष्पा खैरकर यांना व्हीलचेअर प्रदान करण्यात आली.

       या प्रसंगी खैरकर कुटुंबीयांच्या त्यांच्या डोळ्यांत दाटलेले आनंदाश्रू आणि चेहऱ्यावर उमटलेला दिलासा हा उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेला.

   ही मदत त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची ठरली असून आता त्यांना दैनंदिन जीवन अधिक सुलभ होणार आहे.

  या प्रसंगी किशोर पंदीलवार, गजानन पाटणकर, सुरज टोमते, रमेश लीगमपल्लीवार, सुरेख इटनकर, योगिता ढेंगरे आणि नीता डाखोरे यांची उपस्थिती होती.

  आ. सुधीर मुनगंटीवार हे नेहमीच कष्टकरी, शेतकरी, महिला, गरजू आणि दिव्यांग बांधवांसाठी विविध माध्यमांतून मदतीचा हात पुढे करत असतात.

       त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्यामुळे समाजात त्यांच्याविषयी आदर आणि विश्वास निर्माण झाला असून अनेक लोकप्रतिनिधी त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवत आहेत.

    ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून केलेली मदत आहे.

        एखाद्याच्या आयुष्यात दिलेला छोटासा आधारही किती मोठा बदल घडवू शकतो, याची जाणीव करून देणारी ही हृदयस्पर्शी घटना आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here