Home
Home चंद्रपूर मेंदू विज्ञानावरील असाधारण आणि अद्वितीय परिसंवाद थाटात संपन्न!

मेंदू विज्ञानावरील असाधारण आणि अद्वितीय परिसंवाद थाटात संपन्न!

0
30

HELLO CHANDA NEWS

      चंद्रपूर(का. प्र.): ब्रेनीवूड इंडिया आणि चिल्ड्रन्स अकॅडमी चंद्रपूरच्या वतीने मेंदू विज्ञानावरील असाधारण आणि अद्वितीय परिसंवाद, (THE EXTRAORDINARY AND UNIQUE SEMINAR ON BRAIN SCIENCE) चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे अतिशय थाटात संपन्न झाला.

  हा परिसंवाद कार्यक्रम चंद्रपूरचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

      या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी साप्ताहिक कलम मांगे इन्साफ चे मुख्य संपादक सय्यद रमजान अली,जय हिंद कॉन्व्हेन्ट चे संस्थापक मनीष तिवारी, चिल्ड्रन्स अकॅडमी चे संचालक प्रशांत हजबन, संचालक मयूर बनकर, ताज कुरेशी, ब्रेन सायन्स चे नॅशनल ट्रेनर डॉ. ज्योती शर्मा, ब्रेन सायन्स ट्रेनर/ मुख्याध्यापिका अक्षता मोगरे – हजबन प्रामुख्याने मंचावर हजर होते.

 मंचावरील सर्व मान्यवरांचे स्वागत – सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले.

  आपल्या अध्यक्षीय भाषणात चंद्रपूर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी तुमच्या यशाला प्रज्वलित करा असे आव्हान करीत सांगितले की आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपल्या मुलांचे आवडी निवडी जपून त्यांच्या कला कलाने घ्यावे तसेच आता तर अनेक क्षेत्रात आपले करिअर करण्याची संधी आपल्या पाल्यांना उपलब्ध झाली आहे.

 त्यामुळे आपल्या पाल्याचे करिअर करताना जाणकारांचे सल्ले घेऊन योग्य त्या क्षेत्रात यश संपादन करता येईल असे म्हणत सखोल असे मार्गदर्शन त्यांनी उपस्थितांना केले.

  कार्यक्रमाचे उद्घाटक अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी सांगितले की आपल्या मुलाला सर्वप्रथम एक चांगला माणूस बनवा मग तो कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होणारच!

 त्यांनी पुढे सांगितले की आम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा आत्महत्या हा शब्द कानावर पडला नव्हता, परंतु आता पोलिस खात्यात आल्यानंतर समजलं की क्षुल्लक अश्या कारणावरून मुलं आत्महत्या करतात हे योग्य नाही, पालकांनी आपल्या इच्छा मुलावर लादू नये त्या मुलाला विचारले पाहिजे की तुला काय करायचे आहे तसे केल्यास मुलाचे मनोबल खचणार नाही व त्यांना यश ही संपादन करता येईल असे आशयाचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

 कलम मांगे इन्साफ चे मुख्य संपादक सय्यद रमजान अली यांनी आपल्या शेर – ओ – शायरीच्या माध्यमातून उद्बोधनात्मक असे मोलाचे मार्गदर्शन केले.

                  चिल्ड्रन्स अकॅडमी च्या मुख्याध्यापिका अक्षता मोगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच शाळेविषयी, ब्रेन सायन्स विषयी उपयुक्त अशी माहिती दिली.

       शाळेचे संचालक प्रशांत हजबन यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत महत्वाचे मार्गदर्शन केले.

      ब्रेन सायन्स च्या नॅशनल ट्रेनर डॉ. ज्योती शर्मा यांनी
तुमच्या मुलांच अभ्यासात मन लागत नाही काय ?

तुमच्या मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही काय ?

तुमची मुले सतत मोबाईल बघतात काय ?

  तुमच्या मुलांना परीक्षेची भिती वाटते काय ? अश्या अनेक प्रश्नांचे उत्तर देत ब्रेन सायन्स बाबत सखोल असे मार्गदर्शन केले.

    व काही प्रात्यक्षिके मेंदू विज्ञानच्या विद्यार्थ्यांकडून मंचावर प्रत्यक्ष करून दाखविले त्यामुळे उपस्थित पालक व विद्यार्थी हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाले व ब्रेन सायन्स आपल्या मुलाच्या उज्वल भविष्यासाठी सहाय्यक ठरणार असे विश्वास देखील त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

 या कार्यक्रमाला चिल्ड्रन्स अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल चे शिक्षक शिक्षिका सह शहरातील नागरिक आपल्या पाल्यासह फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here