Home
Home चंद्रपूर स्व.साधनाताई आमटे यांची जयंती भाजप महानगर कार्यालयात उत्साहात साजरी.

स्व.साधनाताई आमटे यांची जयंती भाजप महानगर कार्यालयात उत्साहात साजरी.

0
39

HELLO CHANDA NEWS

  चंद्रपूर,(का. प्र.) : भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने स्वर्गीय साधनाताई आमटे यांच्या जयंती निमित्त महानगर कार्यलयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

         यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

      यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महामंत्री सायली तोंडरे, नगरसेविका पुष्पा उराडे, सविता कांबळे, सारिका संदूरकर, आशा देशमुख, ज्योती जीवणे, अनुसूचित जाती अध्यक्षा विमल कातकर, कल्पना शिंदे, छाया चवरे, रंजना लांभे, अंजू तोरे, लता ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती.

         स्व. साधनाताई आमटे या भारतातील एक महान, त्यागी व प्रेरणादायी समाजसेविका होत्या. प्रख्यात समाजसेवक बाबा आमटे यांच्या सहचारिणी म्हणून त्यांनी त्यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला.

  आनंदवन या ऐतिहासिक प्रकल्पाच्या उभारणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. आनंदवन हे केवळ पुनर्वसन केंद्र नसून स्वावलंबन, सन्मान आणि मानवतेचे जिवंत प्रतीक आहे.

 कुष्ठरोग्यांविषयी समाजात भीती व तिरस्कार असताना साधनाताईंनी त्यांच्याशी मातेसारखे प्रेम व आपुलकीने वागून त्यांना नवजीवन दिले. त्यांनी केवळ सेवा केली नाही, तर त्या रुग्णांसाठी कुटुंबाचा आधार बनल्या.

त्यांचे संपूर्ण आयुष्य “सेवाच धर्म” या विचाराचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

त्यांच्या जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने महानगर कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    यावेळी उपस्थितांनी त्यांच्या जीवनप्रवासावर तसेच त्यांच्या सेवाभावी कार्यावर प्रकाश टाकत साधनाताईंच्या कार्याचा गौरव केला व त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here