HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) : महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील महान, दूरदृष्टी असलेले राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज बुधवारी भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालय, गांधी चौक, चंद्रपूर येथे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष तथा मनपा नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री सविता दंडारे, विधानसभा प्रमुख वंदना हातगावकर, ओबीसी आघाडी अध्यक्ष विनोद शेरकी, महामंत्री मधुकर राऊत, शैलेश इंगोले, उपाध्यक्ष सचिन संदुरकर, नगरसेवक भालचंद्र दानव, नगरसेविका सारिका संदूरकर, अल्पसंख्याक अध्यक्ष राशीद हुसेन, अनुसूचित जाती अध्यक्षा विमल कातकर, मंजुश्री कासनगोट्टूवार, कार्तिक बोरेवार, शालू कन्नोजवार, देवा कुंटा, आकाश लडके, साई कोटा, रणजित मातंगी आदी उपस्थित होते.
छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील दुर्बल, मागासवर्गीय व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर कार्य केले. शिक्षणाचा प्रसार, सामाजिक समानता आणि आरक्षणाची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे ते पहिले प्रगतिशील शासक म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या कार्यामुळे समाजात समतेची भावना निर्माण झाली असून अनेकांना नवजीवन मिळाले आहे.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले आणि सामाजिक न्याय, बंधुता व समतेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.






















